भाजपाने केलेल्या दौऱ्यादरम्यान सफाईचे काम दरवर्षी पेक्षा १५ दिवस उशिरा झाले आहे.
नालेसफाईचे काम होऊनही दरवर्षी मुंबईची तुंबई होते. यंदाही याची पुवरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपच्या आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई महापालिका (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना या नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची मागणी केली. दरम्यान, भाजपाने (BJP) केलेल्या दौऱ्यादरम्यान सफाईचे काम दरवर्षी पेक्षा १५ दिवस उशिरा झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मुद्द्याला घेऊन आता आशिष शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर धारेवर धरलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.
यात शेलार म्हणतात, भाजपाने पाठपुरावा केला तेव्हा उशिर झालेले नालेसफाईचे कंत्राट मंजूर झाले आहे. भाजपाने नालेसफाईच्या कामांची पाहणी हाच 'सेवा सप्ताह' असे जाहीर करताच मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात मिटींग घ्यावी लागली. भाजपाने दौरे सुरु करताच मुंबईचे पालकमंत्री जागे झाले. पण अजूनही पाहणीसाठी नाल्यावर उतरले नाहीत, असे दिसत आहे. भाजपाने दौऱ्याचा सविस्तर अहवाल देऊन टास्क फोर्सची मागणी केली, प्रशासनाला मान्यही करावी लागली. भाजपाने भयाण वास्तव मांडताच स्वतः पालिका आयुक्तांना पाहणी दौऱ्यास उतरावे लागले. मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून बहुतेक थंड हवेच्या ठिकाणी फरार होण्याचा कमीशनवाल्यांचा कट असावा असं म्हणत त्यांनी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, यंदा मुंबईतील नालेसफाईचं कामं दरवर्षीपेक्षा 15 दिवस उशिरानं सुरु झालं आहे. आजपर्यंत 10 % पेक्षा जास्त काम झालेलं नाही. मागील वर्षी 17 मे लाच वादळी वाऱ्यासह तौक्ते वादळ आले होते. यात मुंबईची तुंबई झाली होती. यावर्षीही लवकर पावसाळा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खूप कमी वेळ असल्यानं पारदर्शी पद्धतीने नालेसफाईची कामे पूर्ण होण्याची गरज आहे, असंही शेलार सुचवलं सांगितलं. शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त चहल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नालेसफाईवर आयुक्तांशी चर्चा केली. मुंबईची पाहणी केल्यानंतर मुंबई धोक्याच्या वळणावर असून सत्ताधारी फरार व प्रशासन हाताची घडी घालून बसले असल्याते ते म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.