Uddhav Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : ''पन्नास ठिगळं लावून उद्धव ठाकरे गोधडी शिवत आहेत'', भाजपकडून जोरदार टीकास्र

संतोष कानडे

मुंबईः ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे सध्या पन्नास ठिगळं लावून गोधडी विणत आहेत, एखादा आपल्या विचारांशी किती प्रतारणा करु शकतो, याचं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आहेत; अशी टीका भाजपकडून करण्यात आलीय.

ठाकरे गटाने रविवारी समाजवादी पक्ष आणि इतर २२ संघटनांसोबत युती केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्यात मतभेद होते परंतु ते आम्ही बाजूला सारले आहेत. भाजपने एकीकडे पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या अंगावर फुलं टाकली आणि दुसरीकडे आम्हाला हिंदूत्व शिकवत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या सगळ्या मुद्द्यांना भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. शेलार म्हणाले की, 50 ठिगळं एकत्र करून उद्धव ठाकरे गोधडी जोडत आहेत. आपल्या विचारांशी प्रतारणा किती करू शकतो, याचे उदाहरण उद्धव ठाकरे आहेत.

ते पुढे म्हणाले की, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, परंतु ते स्वतः मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो त्यांनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पंक्तीत नेऊन बसवला. राम मंदिर वर्गणीची चेष्टा उद्धव ठाकरे यांनी केली.

पाकिस्तानी खेळाडूंवरील टीकेवर बोलताना शेलार म्हणाले, पाकिस्तानी खेळाडूंच्या स्वागतात भाजप आणि बीसीसीआयचा सबंध नाही तो इव्हेंट आयसीसीचा होता. याकूब मेमनच्या थडग्याला फुलं घातली, त्या उद्धव ठाकरे यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये.

आम्ही लोकसभा आणि मुंबई निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. प्रत्येक नेत्याला विशेष जबाबदारी, विधानसभा आणि लोकसभा जबाबदारी असा कार्यक्रम आमचा सुरू झाला आहे. मुंबईत सहाही जागा जिंकण्यासाठी एक कोअर ग्रुप तयार केलाय, असं आशिष शेलारांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT