नांदेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाविकास आघाडी सरकार मधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा रविवारी (ता. १३) बिलोली तालुक्यातील विविध कामाचे लोकार्पण सोहळा, भूमी पुजनासह कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिलोली तालुक्यातील पहीला दौरा हा लोहगाव येथील होता. या ठिकाणी त्यांच्या हस्ते आरोग्य केंद्राच्या मुख्य ईमारतीचे व निवास्थानाचे लोकार्पण सोहळा झाला. पंरतु यातील बरीच कामे अर्धवटच आहेत.
बिलोली नगरपरिषेदेचीही या पेक्षा काही वेगळी अवस्था नव्हती. म्हणून सर्वसामान्याला पडलेल्या प्रश्नात एवढी घाई उद्घाटनाची का झाली ? बिलोली देगलुर विधान सभा डोळ्यासमोर ठेवून प्रचारात एवढी कामे केल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी की आचारसंहीता लागल्यावर काही करता येणार नाही या भावनेने असा सुर सर्वत्र ऐकावयास मिळाला. या दरम्यान आघाडी सरकारमधील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबने यांना कार्यक्रमाला निमंत्रण दिले नसल्यामुळे व पिक विमा गेल्या दोन वर्षापासून रखडल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून टोलनाक्यावर अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यामुळे सेनेच्या काही कार्यकर्त्यांना बिलोली पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. पुढे काय झाले याबद्दलची माहिती उपलब्ध झाली नाही.
कोरोनाचा काळ असताना मंत्री महोदयांच्या या दौऱ्यात कुठेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यात आलेले दिसले नाही. प्रत्येक ठिकाणी तुफान गर्दी पहावयास मिळाली. तालुक्यात एक चर्चा ही ऐकावयास मिळाली ज्या -ज्या वेळेस अशोक चव्हाण बिलोलीत येथील त्या वेळी नक्कीच कुठली तरी निवडणूक असेल असे गणीत असल्याचे सांगितलं जात असुन या भागाचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे कोरोनाने दोन महीण्यापुर्वी निधन झाले असल्याने त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी निवडणूक लागू शकते म्हणून ब-याच अर्धवट कामाचे लोकार्पन सोहळे घाई- घाईने उरकण्यात आले आहेत.
लोहगावच्या आरोग्य केंद्राचे फक्त गिलावा व फरशी झाली असून शौचालयासह बाकी सर्वच काम अपुरी आहेत. तर निवास्थानचे केवळ छत टाकण्यात आले आहे. बिलोली नगरपालिकेलाही वरच्या मजल्यावर भेगा दिसून येत आहेत. हे सर्व खटाटोप आचारसंहिता लागेल व निवडणुकीत बोलण्यासही मुद्दा होईल या कारणाने करण्यात आल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे यातील बरीच कामे ही सुभाष साबने यांच्या निधीतील असून त्यांना कार्यक्रमातुन वगळल्याने सेनेकडून तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मध्यावती विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या एका जवळ च्या आमदाराने रितेश अंतापुरकर यांना तिकीट देवून निवडून आल्यानंतर सर्व सुत्र आपल्या हाती ठेवता येतील याची ही व्युहरचना आखल्या जात असल्याचे ऐकण्यात येत आहे. यावेळी लोहगाव, पाचपिंपळी, बेळकोणी रोडवर, कासराळी, बिलोली, गंजगाव, कुंडलवाडी, आरळीसह आदी ठिकाणी विविध कार्यक्रमे पार पडली.
येथे क्लिक करा - भाजपने सत्तेच्या काळात चुकीचे कायदे केले- अशोक चव्हाण
अशोक चव्हाण यांचे षडयंत्र हे कदापी सहन केल्या जाणार नाही- समन
आजपर्यत अशोक चव्हाण हे दावपेचाचे राजकरण करत आले असून हे शिवसेना कदापी सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील समन यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की आज जी यांनी उद्घाटणे करत फिरत आहेत त्यातील बहुतांश कामे हे माजी आमदार सुभाष साबने यांच्या निधीतील आहेत. त्यांनी अनेक कामे खेचून आनली आहेत. आणि त्यांनाच कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही किंवा बँनरवर एखादा फोटोसुध्दा लावण्यात आला नाही. हा महाविकास आघाडीचा धर्म आहे का ? ते फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत शिवसेनेची यांना गरज नाही काय असा सवाल उपस्थित करत त्यांना फक्त नांदेड, भोकर, मुदखेडच दिसत असून बाकी कुठेही लक्ष नसते असा आरोप ही करण्यात आला.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.