जपान दौरा अर्ध्यावर सोडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज मुंबईत येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याच्या राजकीय घडामोडीत नार्वेकर मुंबईत येणार म्हणजे राज्यात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Assembly Speaker Rahul Narwekar come Mumbai today Japan tour halfway Ajit Pawar)
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर गेले आहेत.
दरम्यान, राज्यात अजित पवार भाजपसोबत नवी सत्ता स्थापन करणाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच राहुल नार्वेकर यांना तातडीने बोलवण्यात आलं आहे.
त्यामुळे नार्वेकर जपान दौरा अर्ध्यावर सोडून मुंबई तातडीने येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रातील बातमीनुसार, आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, असे पक्षातील सूत्रांनी सांगितल्याचा दावा करण्यात आलाय.
उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना सुप्रीम कोर्ट अपात्र ठरवेल, असे गृहित धरून शिदेंच्या जागी अजित पवार यांची वर्णी लागू शकते, असा दावा याच वृत्तपत्राने केला होता.
त्यामुळे कोर्टाच्या निकालापूर्वीच अजित पवारांच्या साथीने नवं सरकार स्थापन होणार अशा चर्चेने जोर धरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.