Narhari Zirwal esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Poltical Crisis: राज्यातील सत्तासंघर्षावर महत्वाच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल

गेल्या अकरा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर आज फैसला होण्याची शक्यता

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या अकरा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर आज फैसला होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकार तरणार की जाणार? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीच घटनापीठाकडून उद्या दोन महत्त्वाचे निकाल लागण्याचे संकेत दिले आहेत. आज सकाळी साडेअकरानंतर निकाल लागण्याची शक्यता असल्याने सर्वपक्षीय नेत्यांची धाकधूक वाढली आहे.(Latest Marathi Political News)

अशातच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल आहेत. झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद आहेत तर ते गावच्या घरीही उपस्थित नाहीत. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या दिवशी नॉट रीचेबल आहेत. झिरवळ यांनी या 16 आमदारांना आपत्रतेची नोटिस पाठवली होती. कालपासून ते माध्यमांसमोर येण्यास टाळाटाळ करत होते. त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की, ते त्यांच्या गावी असणार आहेत. पण ते त्यांच्या गावी नसल्यामुळे आणि त्यांचे दोन्ही फोन बंद असल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

आजच्या महत्वाच्या दिवशी नरहरी झिरवळ नॉट रीचेबल आहेत. तर अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. खासगी दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. याबाबतचे वृत्त 'ABP माझा'ने दिले आहे.(Latest Marathi Political News)

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्या. एम.आर.शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि पी.नरसिम्हा यांच्या घटनापीठापुढे सत्तासंघर्षावर दोन महिन्यांपूर्वीच दीर्घ सुनावणी पूर्ण झाली.

त्यानंतर घटनापीठाने निकाल राखून ठेवला होता. घटनापीठातील सदस्य न्या.एम.आर.शहा हे येत्या १५ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्याआधीच निकाल येईल असे संकेत मिळत होते. सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका दाखल झाल्या आहेत त्यात सोळा आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाने दिलेल्या आव्हानाचाही समावेश आहे.(Latest Marathi Political News)

‘त्या’ सोळा आमदारांचे काय?

राज्यातील सोळा आमदारांशी संबंधित अपात्रतेच्या मुद्द्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या आमदारांच्या यादीत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, बालाजी किणीकर, महेश शिंदे, अनिल बाबर, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर, लता सोनावणे, रमेश बोरणारे, प्रकाश सुर्वे यांचा समावेश आहे. (Latest Marathi Political News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT