महाराष्ट्र बातम्या

किशोरी पेडणेकरांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने

सूरज यादव

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.पहिल्या दिवशी आऱोग्य भरती घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. आजही पुन्हा टीईटी, म्हाडा, आरोग्य विभागाच्या भरती घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. याचसोबत अतिवृष्टीचा कोकण आणि विदर्भाला फटका बसला. मात्र आजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही यावरून देखील विरोधक सरकारला घेरण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बालकांच्या मृत्यूवरून फडणवीस संतापले, विरोधकांचा गदारोळ सुरूच

मुंबईत सेप्टिक शॉकमुळे बालकांचा मृत्यू होत असल्यास हे गंभीर प्रकरण आहे, असं फडणवीस म्हणाले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याची मागणी केली. यावर सविस्तर चर्चा घडवून आणण्याची मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी केली. त्यावर नरहरी झिरवळ यांनी सरकारला निवेदन सादर करण्याची सूचना केली. मात्र विरोधकांचा सविस्तर चर्चेचा आग्रह फेटाळल्याने विधानसभेत गोंधळाला सुरुवात झाली. त्यामुळे 10 मिनीटांसाठी कामकाज थांबवण्यात आलं आहे.

कोरोनाच्या संकटाकडे गांभीर्यानं पाहा, मास्क लावा; अजित पवार यांचे आवाहन

अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरु आहेत. देशाचे पंतप्रधान मोदीसुद्धा कोरोनाच्या संकटाचा गांभीर्यानं विचार करत आहेत. रात्री लॉकडाऊन करण्याचा विचार देशपातळीवर सुरु, ठराविक सोडले तर कुणीही मास्क इथं लावत नाही. संपूर्ण महाराष्ट्र इथं काय चाललंय ते पाहतो. काहींची अडचण आहे की मास्क काढल्याशिवाय मांडता येत नसेल तर तो त्यांचा प्रश्न, पण बोलून झाल्यानंतर तरी मास्क लावावा असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदस्यांना कोरोनाच्या संकटाच्या गांभीर्याची जाणीव करून दिली.

मास्क लावला नसेल तर मलाही बाहेर काढा - अजित पवार

परदेशात मृत्यूची संख्या जास्त आहे. या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या. माझ्यासारख्याने मास्क लावला नसेल तर मलाही बाहेर काढा. मला याबद्दल वेगळं सांगायचं नाही. पण आपण वेगवेगळ्या माध्यमात दिसतो. आता त्याचा भाऊच समोर आला, नवा विषाणू समोर आलाय . त्यामुळे काळजी घ्या, मास्क लावा असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

फडणवीस दिशाभूल करतायत - नवाब मलिक

फडणवीस दिशाभूल करत आहेत. हा विषय धर्म आधारावर आरक्षण हा नाही. ५० टक्के आरक्षण आता शिथिल होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा आमचा मानस आहे, त्यामुळे मर्यादा वाढवायला हवी असं नवाब मलिक म्हणले.

धर्माच्या आधारावर आरक्षणाला आमचा विरोधच - फडणवीस

मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या विषयावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, मराठा, मुस्लिम आरक्षण प्रश्न मार्गी लागलीत पण केंद्राने ५० टक्के मर्यादा वाढवावी, घटनादुरुस्ती करावी त्याशिवाय हा निर्णय पुढे जाणार नाही. दरम्यान, यावर उत्तर देताना फडणवीस यांनी धर्माच्या आधारावर आरक्षणाला आमचा विरोधच राहील असं म्हटलं. ते म्हणाले एक गोष्ट ऐकली, राजाचा पोपट मेला, पण सांगणार कोण. आता नवाब मलिक सांगतायत की, अखेरीस मुस्लिम आरक्षण देता येणार नाही, धर्माच्या नावाखाली आऱक्षण देता येत नाही. आता हे समजल्यावर केंद्रावर टाकत आहेत. आमच्या काळात आंदोलन कलं. जोरजोरात ओरड केली. आता भाषा बदलली. धर्मावर आधारीत आरक्षण देता येत नाही हे आम्ही सांगितलं होतं.

आदित्य ठाकरे यांच्या धमकी प्रकरणाच्या तपासासाठी राज्य स्तरावर एसआयटी स्थापन करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. ते म्हणाले की, वेगवेगळ्या सदस्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत. या सगळ्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी राज्य स्तरावर एक एसआयटी स्थापन करत आहे. यात आलेल्या धमक्या, त्याचा तपास, भविष्यात काय उपाययोजना करायच्या यासाठी एसआयटी स्थापन करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

इथं बोर्ड लावा, गोंधळ! विधानसभा चालू आहे - मुनगंटीवार

मंत्र्यांना, आमदारांना येणाऱ्या धमक्या गांभीर्याने घ्या, हे गंभीर आहे. जर गांभीर्याने घ्यायचे नसेल तर मी दररोज बाहेर येताना एक बोर्ड पाहतो, शांतता कोर्ट चालू आहे. आता इथं बोर्ड लावा गोंधळ, विधानसभा चालू आहे असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्र्यांना मिळणाऱ्या धमक्यांच्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचं म्हटलं. त्याआधी मुनगंटीवार म्हणाले की, मिलिंद नार्वेकर धमकी अली मी कमिशनरना फोन केला कोण आहे तो ज्याने धमकी दिली? Whatsapp वर धमकी देणारा अजून सापडला नाही. देश कसा सुरक्षित राहील असाही प्रश्न मुनगंटीवार यांनी विचारला.

आदित्य ठाकरेंना धमकी; फडणवीस यांनीही केली चौकशीची मागणी

आदित्य ठाकरेंना धमकी येते, हे गंभीर आहे. पण सुनिल प्रभूंनी भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला. गौरी लंकेश यांची हत्या कर्नाटकात, तर दोन हत्या महाराष्ट्रात झाल्या. प्रत्येक प्रकरणाला राजकीय रंग देऊन फायदा नाही. नवाब मलिक यांनी जे सांगितलं, अध्यक्ष महोदय ट्रेंडिंग झालं, त्याची चौकशी करा. रझा अकादमीची चौकशी करा. सनातनचं सांगताय. दोन वर्षांपासून तुमचं सरकार आहे, तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुम्ही का कारवाई केली नाही असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरेंना आलेली धमकी गंभीर आहे. त्याची उच्च स्तरीय चौकशी करा आणि या प्रकरणी कारवाई करावी अशीही मागणी फडणवीस यांनी केली.

आदित्य ठाकरेंच्या धमकीचे कर्नाटक कनेक्शन आणि भाजपची सत्ता - नवाब मलिक

निलोफर उत्पलला सुशांत सिंह राजपूत ट्रेंड करण्यासाठी ३ लाख रुपये देण्यात आले. तिकडच्या सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास सांगितलं, अद्याप यातून काहीच निष्पन्न झालं नाही. याचे धागेदोरे कर्नाटकात आहेत. ट्विटरवरून मलाही धमक्या येतायत, गृहमंत्र्यांना याची कल्पना दिलीय, सनातनसारख्या संस्था या दाभोळकर, कलबुर्गी यांच्या हत्येमागे आहेत. गोव्यात भाजपकडून पाठराखण केली जातेय. आयपीएस अधिकार्याच्या माध्यमातून एसआयटी नेमायला हवी. आमच्या सरकारला बदनाम करण्याचं कट कारस्थान होतंय. कर्नाटक, कलबुर्गी, लंकेश हत्या यांचे कनेक्शन आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीशी असल्याचं नवाब मलिक हे विधानसभेत म्हणाले.

२५ हजार कर्मचारी कामावर रुजू, संपामुळे ६५० कोटींचे नुकसान - अनिल परब

प्रश्नोत्तराच्या तासात परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, एसटी संपात आज 25 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर या संपात एसटीचे साडे सहाशे कोटींचे नुकसान झाले असल्याचंही परब यांनी सांगितले.

आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि एकाला नोकरी देणार आहात का असा प्रश्न विधानसभेत विचारण्यात आला. यावर परिवहनमंत्री अनिल परब यांनी उत्तर देताना म्हटलं की, आत्महत्या कोणत्या कारणासाठी झाल्यात त्याचा अहवाल मागवला आहे. मृतांच्या वारसांना नोकरी देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांची वैद्यकीय बिले आहेत ती पटलावर ठेवतो आणि ती देण्याच प्रयत्न करतो असंही परब यांनी सांगितलं.

दहावी, बारावी परीक्षेचे अर्ज दाखल करण्यात तांत्रिक बिघाडाची तक्रा नाही - वर्षा गायकवाड

दहावी, बारावीची अर्ज प्रक्रिया एकाच वेळी सुरु झाल्यानं सर्व्हर डाऊन झाले होते. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर अर्ज दाखल करता आले नाहीत. शिक्षण मंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दहावी, १२ वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज मिळाल्याची माहिती दिली होती. पुढच्यावेळी अशी गैरसोय होणार नाही यासाठी राज्य शिक्षण मंडळ संकेतस्थळाच्या त्रुटी दुर करणार का? मुंबईत सर्वाधिक शाळा आहेत, मुंबईसाठी स्वतंत्र स्लॉट तयार करून देणार का? कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या पालकांची नोकरी गेली, परीक्षा शुल्काचा परतावा मिळालेला नाही, त्यांना परतावा परत मिळणार का? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर वर्षा गायकवाड यांनी उत्तर देताना म्हटलं की, तांत्रिक बिघाडाची कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नाही.

मुस्लिम समाजाला नोकरी, शिक्षणात ५ टक्के आरक्षण विचाराधीन - नवाब मलिक

मुस्लिम समाजाला नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे विधान सभेत लेखी उत्तरात म्हटलं आहे.

वीज चोरी होत असल्याचं म्हटल्यानं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शेतकऱ्यांना चोर म्हणताय का असं विचारलं. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ सुरु केल्यानं पाच मिनिटांसाठी कामकाज स्थगित कऱण्यात आलं.

केंद्राच्या नावाने ओरड करायचा प्रयत्न केला ही दुर्दैवी गोष्ट आहे असं म्हणत पडळकरांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. ते म्हणाले की, बुलढाण्याच्या एका शेतकऱ्यानं २० वर्षापूर्वी अर्ज केला. आजही त्याला कनेक्शन मिळालं नाही. ६ डिसेंबर २०२१ ला त्याला वीजबील दिलंय. शिवाय दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या मोटारी बंद असूनही त्याला भलं मोठं बिल दिलं आहे. जर तुम्ही अशी बोगस बिलं दिली असतील तर तुम्ही खात्याला बिलं दुरुस्त होणार नाही तोपर्यंत वीज कनेक्शन तोडणार नाही याचे आधेश देणार का? तोडलेले कनेकश्न जोडण्याचे आदेश देणार का? बिल दुरुस्तीचे कँप घेणार का? डीपीचा लोड कमी जास्त होतोय ते तुम्ही सुरळीत होणार का? असे प्रश्न पडळकरांनी विचारले.

केंद्राने त्यांना कर्ज उपलब्ध करून देताना काही नियम दिलेत आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे आपल्याला पैसे उपलब्ध होणार नाहीत अशी माहिती राज्याच्या उर्जा राज्यमंत्र्यांनी दिली.

मुद्यावर प्रश्न विचारावेत असं म्हणत उर्जा राज्य मंत्र्यांना मुद्यावर बोलण्यास सांगितलं. यावर नितीन राऊत यांनी उत्तराला वेळ द्यावा अशी मागणी केली. तसंच ते पैशाचे सोंग आणता येत नाही असंही म्हटलं. यावर पैशाचं सोंग आणता येत नसेल तर सरकार सोडून द्या ना असंही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले. तुम्ही वेगवेगळे कर कमी करता, वाईन उत्पादकांना अनुदान देता, पण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय . महाराष्ट्राच्या बळीराजाला आधार देण्याची गरज, त्याचे वीज कनेक्शन तोडू नयेत याचे आदेश देणार का? वीजबिलांची दुरुस्ती करणार का असा प्रश्न दरेकरांनी विचारला.

पाच वर्षात १० हजार कोटीचे ४० हजार कोटी थकबाकी झाली तेव्हा आधीच्या सरकारने काहीच मदत महावितरणला केली नाही. केंद्र सरकारने उदय योजना आणली होती. ही वेगवेगळ्या राज्यातील वितरण कंपन्यांवरील आर्थिक भार वाढलेलला आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबणाऱ्या कंपन्यांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्राने पाऊल उचललं होतं असंही प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं.

महावितरणने प्रस्ताव सरकारकडे दिला होता. २२ हजार ९७ कोटींचा प्रस्ताव होता. राजस्थानला ७६ हजार १२० कोटी रुपये त्यांच्या सरकारने दिले. उत्तर प्रदेशला जवळपास ५० हजार कोटी रुपये दिले. तर महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारने ६ हजार कोटींपर्यंत देऊ असं म्हटलं होतं. अशीही माहिती उर्जा राज्य मंत्र्यांनी दिली.

उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदाभाऊ खोत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की, महावितरणची सध्या दमछाक होतेय. महावितरणवर सेवा देताना परवड होतेय, पैशांची चणचण होण्याची वेळ का आली याचा आढावा घ्यायला हवा. २०१४ मध्ये १० हजार कोटी रुपये थकबाकी होती तर सर्व मिळून २० हजार कोटी होती. मार्च २०२० मध्ये शेतीपंपाची थकबाकी ४० हजार कोटी तर एकूण ६० हजार कोटी थकबाकी झाली.

थकबाकी खोटी आणि फुगवून दाखवली आहे, ती थकबाकी तपासून प्रत्यक्षात जितका वापर आहे ते तपासून बिले देणार का, ऑनलाइन-ऑफलाइन केलेलं आहे त्याची चौकशी केलेली नाही, दुप्पट बिलिंग दाखवून दुप्पट अनुदान उचललं आहे त्यामुळे खरं बिल किती आहे ते काढा, दुप्पट बिल काढून अनुदान उचललं असेल तर तुम्ही काय कारवाई करणार? यापुढे असं होणार नाही याची काळजी घेणार का ? असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी विचारला.

मोफत वीज देऊ म्हणालात, मोफद देणं बाजुलाच राहिलं पण वाढीव बिलं दिलीत आणि डबल युनिट केल्यानं सरकारचं अनुदानही डबल घेतलं, शेतकरी वीज मंडळाचं देणं लागत नाही, तर वीज मंडळच शेतकऱ्यांचं देणं लागतं - सदाभाऊ खोत

शेतकऱ्याच्या वीज बीलावर १० एचपीचा वापर म्हणून बील दिलं, पण प्रत्यक्षात ३ एचपीचा वापर होता. राज्यात असं मोठ्या प्रमाणावर घडलं असल्याचंही सदाभाऊ खोत म्हणाले.

विधीमंडळाचे अधिवेशन दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत

वीज महामंडळाचा गैरव्यवहार लपवण्यासाठी शेतकरी जास्त वीज वापरत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय - सदाभाऊ खोत

मनिषा साने प्रकरणाची चौकशी मी केली, अकरा वाजेपर्यंत जाण्यास परवानगी नाही, मग दोन वाजेपर्यंत कशी फिरली, फोटो काढला पण दोन पर्यंत तिला परवानगी दिली कशी अशी विचारणा अध्यक्षा निलम गोऱ्हे यांनी केली. यावर उत्तर देताना सतेज पाटील यांनी म्हटलं की, मुलगी फिरत होती तेव्हा पोलिसांनी तिला हटकलं, तिला जाण्यास सांगितलं तेव्हा तिथल्या एका हॉटेलजवळ सीसीटीव्हीचं कव्हरेज कमी आहे, दुर्दैवाने त्याठिकाणी जाऊन मुलगी थांबली होती. जीवरक्षक त्याठिकाणी होता, त्यानं त्याचवेळी पोलिसांना सांगायला हवं होतं, त्याची चौकशी होईल, बेपत्ता मुलगी असून चौकशी सुरु आहे. त्यांची माहिती घेतली जात आहे, तपास बोईसर आणि बांद्रा पोलिस करत आहेत. गरज पडल्यास क्राइम ब्रांचकडे तपास वर्ग करण्यात येईल अशीही माहिती सतेज पाटील यांनी दिली.

लक्षवेधीमध्ये मनिषा कायंदे यांनी बोईसर मनीषा साने बेपत्ता प्रकरणाची माहिती दिली. यावर सतेज पाटील यांनी मिसिंग मनीषा साने प्रकरणाची हिची बांद्रा पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं.

हिवाळी अधिवेशवन : दुसऱ्या दिवसाचे परिषेदेचे कामकाज सुरू

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आज सभागृहात भरती घोटाळा संदर्भात मोठा खुलासा करण्याची शक्यता

लोकलेखा समितीचा अहवाल ही आज मांडला जाणार

विधानसभा अध्यक्ष निवडणूक पद्धत आवाजी मतदानाने करण्याच्या संदर्भात सूचना हरकती नेमक्या काय दिल्या जातात याकडे लक्ष असून सादर केलेल्या पुरवण्या मागणी यावर ही आज चर्चा होइल. आज अनेक विधेयक सभागृहात मांडली जाणार आहेत.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT