vidhansabha election sakal
महाराष्ट्र बातम्या

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर ४ नोव्हेंबरच्या दुपारी साडेतीननंतर सुरू झालेला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज (सोमवारी) सायंकाळी सहानंतर थंडावणार आहेत. त्यानंतर चालणाऱ्या गोपनीय प्रचारावर जिल्ह्यातील भरारी पथकांचे लक्ष असणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर ४ नोव्हेंबरच्या दुपारी साडेतीननंतर सुरू झालेला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज (सोमवारी) सायंकाळी सहानंतर थंडावणार आहेत. त्यानंतर चालणाऱ्या गोपनीय प्रचारावर जिल्ह्यातील भरारी पथकांचे लक्ष असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात एकूण १८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर अपक्ष व बंडखोर उमेदवारांसह अन्य पक्षांच्या उमेदवारांचे आव्हान असणार आहे. ४ ते १८ नोव्हेंबर या काळात महाराष्ट्रातील नेत्यांच्या तुलनेत इतर राज्यातील व केंद्रीय स्तरावरील नेत्यांच्याच सभा सोलापुरात पार पडल्याचे पहायला मिळाले. उमेदवारांनी होम टू होम, पदयात्रा, सभा, कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय छोट्या छोट्या वाहनांना फलक लावून उमेदवारांनी वाहनांद्वारे पण गावोगावी प्रचार केला आहे. सोमवारी प्रत्येक उमेदवारांनी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या बारा तासांचे नियोजन अगदी काटेकोरपणे केले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीचा एक मिनिटही वायफळ जाणार नाही, असे त्यांचे नियोजन आहे.

प्रचारासाठी सोलापुरात आलेले प्रमुख नेते

  • १) महायुती : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, माधवी लता, जे. पी. नड्डा हे भाजपचे नेते सोलापुरात आले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार सिनेअभिनेता गोविंदा यांच्याही सभा पार पडल्या आहेत.

  • २) महाविकास आघाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी या नेत्यांच्याही सभा व त्यांचे दौरे सोलापुरात झाले आहेत.

  • ३) अन्य पक्षांचे नेते : मनसे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याही सोलापुरात सभा झाल्या.

रात्रीच्या गोपनीय प्रचारावर प्रशासनाचे लक्ष

सोमवारी (ता. १८) विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे. आज सायंकाळी सहा ते मंगळवारच्या दिवस-रात्रीच्या हालचालींवर प्रशासनाचे म्हणजेच भरारी पथकांचे लक्ष राहणार आहे. बुधवारी (ता. २०) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहेत. तत्पूर्वी, १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी सहापासून मतदान होईपर्यंत, जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील प्रत्येक संशयित हालचालींवर भरारी पथकांचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT