मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाज महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले यावरून आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात मोठा गोंधळ झाला. काल विजय वडेट्टीवार यांनीही एक व्हिडिओ व्हायरल करून राज्यपालांच्यावर टीका केली होती. आज पुन्हा राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यानयाला पत्यूत्तर म्हणून भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यंत्र्यावर निशाणा साधला आहे. (Atul Bhatkhalkar Criticism On Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना भातळकर म्हणाले, सरकार दाऊदशी संबधित व्यक्तींचा राजीनामा घेत नाही. सरकार मधले मंत्री दाऊद सोबत व्यवहार करतात. आता तर थेट खरेदीचे आरोप कागदोपत्री दिसत आहेत मग मुख्यमंत्री का पाठीशी घालत आहेत कुणाचा दबाव आहे असा प्रश्न उपस्थित केला. राज्यपाल सरकारच्या वतीने भाषण करायला आले होते. यावेळी सदस्यांच्या भावना मात्र तीव्र होतात हे अत्यंत निराशाजनक आहे असा खेद भातळकरांनी व्यक्त केला.
बाळासाहेबांनी भाजप आणि शिवसेनेची युती केली होती. त्यामुळे सापाशी युती बाळासाहेबांनी केली का हे सांगावं.
भाजप आणि शिवसेना युती संदर्भात बोलताना भातळकर म्हणाले, बाळासाहेबांनी भाजप आणि शिवसेनेची युती केली होती. त्यामुळे सापाशी युती बाळासाहेबांनी केली का हे सांगावं. राज्याच्या इतिहासात उद्धव ठाकरे यांचे नाव डांबराने लिहिलं जाईल असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.