'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे दोन वैचारिक ध्रुव'
सध्या राज्यात सुरु असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राजकारण तापलं आहे. तर एका बाजूला पालिका निवडणुकांमुळे नेत्यांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. काल अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे एक नाट्यपूर्ण घटना घडली आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि आमदार रोहित पवार उपस्थित होते. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपाकडून पवारांवर टीका होत आहे. (Latest Political News)
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केलं आहे. यात ते म्हणतात, अत्यंत धार्मिक आणि आयुष्यभर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा वसा घेतलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि कायम बाबरी, ज्ञानवापी मशिदीची कड घेणारे शरद पवार हे दोन वैचारिक ध्रुव आहेत. अहिल्यादेवींनी मशिदींचाही जीर्णोद्धार केला होता, असा शोध भविष्यात इतिहासाचार्य शरद पवार केव्हाही लावू शकतात, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, काल अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी चौंडीत प्रवेश करण्यापासून भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी रोखलं होतं. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.