राज्यभरात सर्वाधिक जिवघेणे अपघात स्थळ औरंगाबाद, त्यानंतर अहमदनगर, धुळे आणि नवी मुंबईत असल्याची माहिती महामार्ग पोलीसांच्या आकडेवारीवरून पुढे आली आहे.
मुंबई - एकाच ठिकाणी पाच अपघात आणि दहा लोकांचा मृत्यु झालेल्या ठिकाणाला जिवघेणे अपघात स्थळाच्या (ब्लॅक स्पॉट) यादीच नोंद केली जाते. त्याप्रमाणे राज्यभरात सर्वाधिक जिवघेणे अपघात स्थळ औरंगाबाद, त्यानंतर अहमदनगर, धुळे आणि नवी मुंबईत असल्याची माहिती महामार्ग पोलीसांच्या आकडेवारीवरून पुढे आली आहे. ज्यामध्ये राज्यभरात 1004 अपघात स्थळ असून, त्यापैकी सर्वाधीक स्थळ राष्ट्रीय महामार्गावर असल्याचे निष्पन्न झाले असून, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दहा जिवघेण्या अपघात स्थळांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील राष्ट्रीय, राज्य, ग्रामीण आणि इतर रस्ते मिळून राज्यभरात 1004 अपघातांची स्थळे (ब्लॅक स्पॉट)असल्याची आकडेवारी महामार्ग पोलीसांनी दिली आहे. वाहतुक नियमांचा भंग करून बेदरकारपणे वाहन चालवत असतांना राज्यभरात 12 हजार पेक्षा जास्त जिवघेणे अपघात झाले आहे. तर 13 हजार पेक्षा जास्त लोकांना आपला वाहन अपघातामध्ये जिव गमवावा लागला आहे. त्यामूळे राज्य परिवहन विभागाकडून सुरूवातीला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात स्थळांवर लक्ष केंद्रित करून सहा महिन्यांच्या मोहिमेमध्ये विविध पद्धतीने अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा अभ्यास केल्या जाणार आहे.
यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर 610 अपघात स्थळ आहे. यातुलनेत राज्याच्या महामार्गावर 202 तर इतर रस्त्यांवर 178 आणि मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर 10 अपघात स्थळ आहे. राज्यभरातील जिल्हानिहाय सर्व रस्ते मिळून अपघात स्थळांची आकडेवारी बघीतल्यास औरंगाबाद शहराचा अपघात स्थळांमध्ये अव्वल नंबर लागत असून, एकट्या औरंगाबाद मध्ये 64 अपघात स्थळ आहे. त्यानतंर अहमदनगर 56, धुळे 54, नवी मुंबई 52, बृहन्मुंबई 48,नांदेड 47, सातारा 42, नागपुर शहर 45, नागपुर ग्रामीण 40 अपघातांची आकडेवारी दिसून येत आहे.
अपघात स्थळांच्या दुरूस्तींचे आव्हान
राज्य परिवहन विभागाने सर्वप्रथम मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गांवरील अपघात आणि मृत्युची सख्या घटवण्याच्या दृष्ट्रीय प्रयत्न सुरू केले आहे. 1 डिसेंबर पासून या मोहिमेला सुरूवात झाली असून, तब्बल सहा महिने द्रुतगती महामार्गांवर परिवहन विभागाची करडी नजर राहणार आहे. त्यामूळे द्रुतगती महामार्गांवर असलेले दहा अपघात स्थळांच्या दुरूस्तीचे आव्हाण परिवहन विभागापुढे राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.