Uddhav Thackeray and Chandarashekhar Bawankule  sakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrashekhar Bawankule : निमंत्रणानंतरही अयोध्येला न जाणाऱ्या उद्धव ठाकरेंचा नास्तिकपणा आला पुढे

'उद्धव ठाकरे यांना यापूर्वी सावरकरांचाही अपमान केला आहे, त्यांना अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण देण्यात आले. त्यानंतरही ते अयोध्येला गेले नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - 'उद्धव ठाकरे यांना यापूर्वी सावरकरांचाही अपमान केला आहे, त्यांना अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण देण्यात आले. त्यानंतरही ते अयोध्येला गेले नाहीत, मतांच्या राजकारणासाठी ते किती खाली गेले आहेत, हे स्पष्ट होत आहे. त्यातूनच उद्धव ठाकरे यांचा नास्तिकपणा देखील आता पुढे आला आहे.' अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

भाविकांना अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेता यावे, यासाठी भाजपच्यावतीने खास नियोजन केलेल्या 'अयोध्या आस्था रेल' ही विशेष रेल्वे बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी अयोध्येला रवाना झाली. यावेळी बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, 'कॉंग्रेस पक्षाने २००८ व २०११ मध्ये अयोध्येमधील रामाचा जन्म आणि रामसेतू या दोन्ही घटना काल्पनिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले, त्यानंतर झालेल्या उत्खननानंतर अयोध्येतील रामाचा जन्म व रामसेतू या दोन्ही घटना काल्पनिक नसून सत्य असल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात केले. या पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने श्री राम मंदिरासाठीचा निकाल दिला.'

अयोध्या येथे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी जाऊ द्यावे, भाजपचे पदाधिकारी, मंत्री तेथे गेल्यास सर्वसामान्य भाविकांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे पदाधिकारी, मंत्र्यांनी तुर्तास जाऊ नये, अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आत्ता अयोध्येला जाता येणार नाही. मात्र आमचा नमस्कार तुम्ही श्रीरामांच्या चरणी अर्पण करा, तेथून तुम्ही जे पुण्य घेऊन याल, त्यातील काही पुण्य आम्हालाही द्या, असे भावनिक आवाहनही बावनकुळे यांनी केले.

कोण गुन्हेगार आहे, हे कसे ठरणार?

आमच्यासमवेत गुन्हेगार असल्याचे फोटो विरोधक सादर करतात, पण आमच्याकडेही हजारो फोटो आहेत. मुळात आपण सार्वजनिक कार्यक्रमात असताना आपल्याबाजूला कोण येऊन फोटो काढेल, ते व्हायरल करेल, यावर आम्ही कसे लक्ष ठेवणार. कोण गुन्हेगार आहे, हे कसे ठरणार. त्यामुळे संबंधित आरोप हे तत्थहीन असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

संख्याबळ जास्त असल्याने अजित पवारांकडे राष्ट्रवादी - बावनकुळे

केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष व त्यांचे चिन्ह दिलेले आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल, नियम व संविधानाप्रमाणे देण्यात आला आहे. ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ आहे, त्यांच्याबाजुने हा निकाल आहे. अजित पवार हे नक्कीच राष्ट्रवादी पक्ष वाढवतील. निकालाबाबत विरोधकांकडून निवडणूक आयोगावर होणारी टीका अयोग्य असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: निवडणूक लढवणं हा मूलभूत अधिकार नाही, उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

ते येतायत! झी मराठीवर येतेय नवी मालिका, तुम्ही ओळखलंत का या जोडीला? नेटकऱ्यांनी सांगितलं मालिकेचं नाव

IND vs NZ: वॉशिंग्टनने पळत येत घेतला अफलातून कॅच, तर जड्डूच्या भारी रनआऊटनं संपली न्यूझीलंडची इनिंग; पाहा Video

Sunetra Pawar: अगं बाळे, घाबरून कसं चालेल? लेकीच्या काळजीने अजितदादा कसे गलबलले; सुनेत्रा पवारांनी सांगितला अनुभव

Latest Maharashtra News Updates : कृष्णराज महाडिक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT