महाराष्ट्र बातम्या

Ramlalla Pran Pratishta: मोदींच्या आवाहनाला देशवासियांचा उत्स्फुर्त प्रतिसाद; देशभरात साजरी झाली दिवाळी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात दिवाळी साजरी करण्याचे तसेच घराघरात रामज्योती पेटवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्यांच्या आवाहनाला देशभरातून नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. (ayodhya ramlalla pran pratishta enthusiastic response of countrymen to PM Modi call of celebrates diwali across country)

नाशिक : त्रंबकेश्वर मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण करण्यात आले.

अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर केवळ अयोध्येतच नव्हे तर संध्याकाळी पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक अशा बड्या शहरांसह राज्यभर आणि उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर लोकांनी रामाची आरती, दिवे आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. तर तरुणांनी चौकाचौकांमध्ये डीजे लावून काहीसं या आनंद सोहळ्यात काहीसं हिडीस प्रदर्शन घडवलं.

नाशिक : घाटावर महिलांनी रांगोळी काढून दिव्यांची आरास केली.

सर्वत्र फटाके, डीजेचा थरथराट

महाराष्ट्रासोबत जम्मू-काश्मीर, दिल्ली, दक्षिणेत केरळ, कर्नाटक या राज्यांसह इतर सर्वच राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात फटाके डीजे असंच वातावरण होतं. अयोध्येत तर सर्व घाटांवर मोठ्या प्रमाणावर पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच विविध ठिकाणी मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.

येवला (अंदरसूल) : अयोध्येत होत असलेल्या सोहळ्याचं प्रतिबिंब.

कसा झाला प्राण प्रतिष्ठा सोहळा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२.१५ वाजता प्राण प्रतिष्ठा विधीला सुरुवात झाली. त्यानंतर १२.२९ वाजता असलेल्या ८४ सेकंदाच्या सूक्ष्म मुहुर्तावर प्राण प्रतिष्ठा पार पडली. यावेळी मोदींबरोबर गर्भगृहात केवळ पाच लोक उपस्थित होते. यामध्ये स्वतः PM मोदी त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्य पुजारी.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मोदींचं भाषण

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आजपासून नवं कालचक्र सुरु झाल्याचं म्हटलं तसेच रामलल्ला आता तंबूमध्ये राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी हिंदू धर्मियांची स्वप्नपूर्ती झाल्याचं म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Accident : खंबाटकी घाटात भीषण अपघात! ब्रेकफेल झालेल्या कंटेनरने सात गाडयांना उडवले: तिघे गंभीर जखमी

Dharavi: धारावी मशीद प्रकरण; दंगल भडकवणाऱ्या पोस्ट व्हायरल, तिघांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

Maratha Reservation : मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे आश्वासन… बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?

Latest Maharashtra News Live Updates: पुन्हा घातपाताचा प्रयत्न?कानपूर येथे रेल्वे रुळावर सापडला गॅस सिलेंडर

मयंक अगरवालच्या भारत अ संघाने जिंकली Duleep Trophy; रोमांचक सामन्यात सुदर्शनच्या शतकानंतरही ऋतुराजच्या संघाचा पराभव

SCROLL FOR NEXT