babasaheb purandare mns raj thackeray 
महाराष्ट्र बातम्या

जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदीसाठी पुरंदरेंनी लिहिलं होतं पत्र; मनसेनं आणलं समोर

हे पत्र मीडियासमोर आणत मनसेनं पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जेम्स लेनच्या छ्त्रपती शिवाज महाराजांवरील 'त्या' वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी एक पत्र ऑक्सफर्ड प्रकाशनाला लिहिलं होतं. हे पत्र मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांसमोर आणलं आहे. यावरुन पवारांना हे पत्र आणि पुरंदरेंची भूमिका माहिती नव्हती का? असा सवाल मनसेनं विचारला आहे.

ठाण्यातील उत्तर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख करत शरद पवारांवर जातीयवादाला खतपाणी घातल्याचा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या या आरोपाला काल पवारांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. यामध्ये त्यांनी जेम्स लेनला पुस्तक लिहायला बाबासाहेब पुरंदरेंनी मदत केल्याच्या कथित आरोपाचं समर्थन केलं होतं. या पार्श्वभूमीवर मनसेनं आज पुरंदरेंचं हे पत्र समोर आणत पुरंदरेंवरील आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

संदीप देशपांडे यांनी म्हटलं, "नोव्हेंबर २००३ मध्ये पुरंदरेंनी दिल्लीतील ऑक्सफर्ड प्रकाशनाला हे पत्र लिहिलं होतं. या पत्रावर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह सहा मान्यवरांच्या सह्या आहेत. यामध्ये निनाद बेडेकर, डॉ. वसंतराव मोरे, डॉ. जी. बी. मेहेंदळे, डॉ. सदाशिव शिवदे, डॉ. जयसिंग पवार आणि तत्काळीन खासदार प्रदीप रावत यांच्या सह्या आहेत"

पत्रात काय म्हटलंय?

या पत्रात सह्या करणारे सर्वजण म्हणतात, "आम्ही प्रत्येकाच्या मतांचा आदर करतो. पण आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवत असलो तरी कुणाचं चारित्र्य मलीन करणं आम्हाला मान्य नाही. जी व्यक्ती कोट्यवधी लोकांचं प्रेरणास्थान आहे, अशा व्यक्तीमत्वावर शिंतोडे उडवणं आम्हाला मान्य नाही. त्यामुळं जेम्स लेनच्या पुस्तकातील ९३ व्या पानावर दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा मजकूर तथ्यहीन आहे. हा मजकूर केवळ जेम्स लेनचा कल्पनाविलास आहे. लेखक आणि प्रकाशकानं मजकूर मागे घेऊन २५ नोव्हेंबरपर्यंत भारतीयांची माफी मागावी आणि पुस्तक तात्काळ मागे घ्यावं. प्रकाशक आणि लेखकानं हे पुस्तक मागे न घेतल्यास आम्ही भारत सरकारकडे कायदेशीर कारवाईची मागणी करु"

शरद पवारांवर केला आरोप

२००३ मध्ये शरद पवार हे सत्तेत होते, तेव्हा त्यांना हे पत्र माहिती नव्हतं का? असा सवाल करत देशपांडे म्हणतात, "कारण राज ठाकरेंनी म्हटलं होतं की, १९९९ नंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं जातीजातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. तो कसा केला त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. पुरंदरेंनी अशी पत्र लिहून निषेध व्यक्त करुन त्यावर बंदी आणण्याची मागणी केली. यावरुन त्यांनी त्यांना कसलीही माहिती दिली नसल्याचं स्पष्ट होतं. तरीही पुरंदरेंना सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Mobile Charging Tips : कितीही वेळ मोबाईल वापरा चार्जिंग संपणारच नाही, सोपी ट्रिक बघाच

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Latest Maharashtra News Updates : सत्तास्थापनेनंतर पहिलाच निर्णय 'लाडकी बहिणीं'चे पैसे वाढवणार?

SCROLL FOR NEXT