mla Bachchu Kadu esakal
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu : तीन संघटना एकत्र येऊन राज्यात तिसरी आघाडी? बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? पत्रकार परिषद घेऊन घोषणा...

Sambhajiraje chhatraparti : महायुती आणि महाविकास आघाडीने ताकदीने विधानसभा लढवण्याचा निर्धार केल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे महायुतीला धडकी भरलेली आहे तर मविआकडे जिंकून येण्याचा निश्चय दिसून येतोय. त्यातच आता एक नवीन आघाडी राज्यात स्थापन होऊ शकते.

संतोष कानडे

अमरावतीः राज्यामध्ये महाविकास आघाडीनंतर आणखी एक तिसरी आघाडी स्थापन होऊ शकते. बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि रविकांत तुपकर हे एकत्रित येवून विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन गट, शिवसेनेचे दोन गट; अशी परिस्थिती असून यातील एक-एक गट भाजपसोबत सत्तेत आहे. तर दुसरे दोन गट काँग्रेससोबत विरोधी पक्षातमध्ये आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीने ताकदीने विधानसभा लढवण्याचा निर्धार केल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे महायुतीला धडकी भरलेली आहे तर मविआकडे जिंकून येण्याचा निश्चय दिसून येतोय. त्यातच आता एक नवीन आघाडी राज्यात स्थापन होऊ शकते.

बच्चू कडू यांची प्रहार संघटना,संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष,रविकांत तुपकर यांची संघटना व आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 'साम टीव्ही'ला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे लवकरच बच्चू कडू व संभाजी राजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, पुणे इथं आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे बच्चू कडू होते. पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात निवडणुकीच्या संबंधाने चर्चा झाली. राज्यभरातील घटक पक्षांना एकत्रित करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT