Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राज्य सरकारसमोर बच्चू कडूंनी हात टेकले; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केला मोठा खुलासा

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही लक्ष लागले, पण...

धनश्री ओतारी

शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही लक्ष लागले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता होती. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. अशातच नाराज असलेले प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आता राज्य सरकारसमोर हात टेकले आहेत. (Bachchu Kadu clearly cabinet expansion Maharashtra Politics Cm Eknath Shinde )

आमदार बच्चू कडू यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. मात्र राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत आता बच्चू कडू यांनी आशा सोडली असल्याचं चित्र दिसले. कारण आता मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं स्वत: कडू यांनी सांगितलं आहे.

आपण लवकरच सत्तेत असणार या अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, मनसे सत्तेत येऊ शकते, त्यांचा एकच आमदार आहे. जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यांना मंत्रिपद मिळाल तर नक्कीच राज ठाकरे सत्तेत येतील. पण मला नाही वाटत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.. मंत्रिमंडळाचा विस्तार आता २०२४ नंतरच होईल, असं बच्चू कडूंनी म्हटलं.

बच्चू कडू यांनी यापूर्वीही दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी आपले मत मांडले आहे,”आमच्या सरकारचा कार्यकाळ सात ते आठ महिने उरला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार करून नाराजी ओढावून घेण्याची मानसिकता सरकारची नाही. म्हणून मला वाटतं, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यापेक्षा ‘जैसे थे’ स्थितीत सरकार चालवणं योग्य आहे.”असं म्हणत त्यांनी आपलं मत मांडलं होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Live Updates : तावडे प्रकरणात पोलिसांनी चौथा एफआयआर नोंदवला

SCROLL FOR NEXT