mla Bachchu Kadu esakal
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu : बच्चू कडूंचं ठरलं! राणांविरोधात भाजपमधून आयात केलेला उमेदवार देणार

Amravati Loksabha : महायुतीमध्ये असलेल्या बच्चू कडू यांनी अमरावतीच्या जागेवरुन रणशिंग फुंकलं आहे. भाजपने नवनीत राणा यांना मैदानात उतरवल्यास आपला उमेदवार उभा करणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे तो उमेदवार भाजपमधलाच असल्याचं त्यांनी सांगितलं.

संतोष कानडे

Amravati Loksabha : महायुतीमध्ये असलेल्या बच्चू कडू यांनी अमरावतीच्या जागेवरुन रणशिंग फुंकलं आहे. भाजपने नवनीत राणा यांना मैदानात उतरवल्यास आपला उमेदवार उभा करणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे तो उमेदवार भाजपमधलाच असल्याचं त्यांनी सांगितलं.

रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, अमरावतीची लोकसभा निवडणूक आम्ही महायुतीमध्येच मैत्रिपूर्ण पद्धतीने लढणार आहोत. ज्या राणाने आम्हाला अपमानित केलं, नको-नको ते बोलले त्यांचं काम आम्ही करणार नसल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. राजकारणातून झीरो झालो तरी चालेल पण एवढी लाचारी नको, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं कडू म्हणाले.

''आमचे कार्यकर्ते म्हणतात, आघाडीला उमेदवारी मागा पण राणांचा प्रचार करायचा नाही. आम्हाला भाजपमधूनच चांगला उमेदवार भेटलेला आहे. नाव जाहीर झाल्यानंतर बऱ्यापैकी काम झालेलं असेल. भाजपमधल्या नाराज कार्यकर्त्यांना मोदीजी पाहिजेत पण राणा नकोत.. शिवसेनेमधलेही लोक सोबत येण्यास तयार आहेत'' असं बच्चू कडूंनी सांगितलं.

काय म्हणाले बच्चू कडू?

नाराज लोकांचा उमेदवार उभा राहू शकतो, अमरावतीसह वर्ध्यातही उमेदवार उभा करण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. वर्ध्यात मला उभं राहण्याची मागणी कार्यकर्ते करीत आहेत. राणांवर नराजी आणि भाजपने विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT