Badlapur School Crime: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राजकीय मुद्द्यांसह सामाजिक प्रश्नांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बदलापूर घटनेवरून महाराष्ट्रात किंवा मुंबईत काय परिणाम होतील यावर बैठकीमध्ये चर्चा झाली. शाळांच्या गेटवर पालकांची प्रचंड गर्दी होत आहे.. मुलंसुद्धा घाबरलेल्या अवस्थेत आहेत. बदलापूर कांड भयंकर आहे, माणुसकीला काळीमा फासणारं कांड आहे. साधारणतः अशा घटनांबद्दल जास्त पालक बोलत नाहीत. हा मेंटल ट्रॉमा असतो, मेंटल स्ट्रेस असतो. मी त्या आई वडिलांना सलाम करतो की ते बाहेर येऊन सांगतात की पोलीस दबाव आणत आहेत.
ठाकरे गटाबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले की, मुंबईमध्ये शिवसेना हा मोठा भाऊ असेल, यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे. मी मोठा भाऊ म्हटल्यानंतर मग तुम्ही जास्त जागा, कमी जागा, लहान भाऊ.. हे सगळं कशाला हवंय. एकदा जागावाटप झालं की तुमच्या हातात चिठ्ठी देऊ आम्ही.
राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकवरुन उत्तर देताना आव्हाड म्हणाले, ते दर वेळेस हेच बोलत असतात. जातीपातीचे राजकारण कोण करतं, कोण भोंगे फोडायला जातं? कोण उत्तर भारतीयांच्या कानाखाली मारतं? हे सर्वांना माहिती आहे.. त्यांना बडबड करू देत त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका.
त्या दिवशी संपूर्ण बदलापूर शहरातील पालक बाहेर आले होते. पुढच्या आठवड्यात अशी परिस्थिती उद्भवेल की अख्खं बदलापूर बाहेर जाईल आणि पोलिसांना म्हणेल की आमच्यावर गुन्हा दाखल करा आणि अटक करा. तुम्ही लोकांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नका.. माणूस गरीब असू शकतो लाचार नाही. पोलिसांनी आतापर्यंत जेवढे पकडले ते सर्व बदलापूरमधील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.