Bahulicha Houd  sakal
महाराष्ट्र बातम्या

Bahulicha Houd : ९ वर्षांच्या या बाहुलीला लोकांनी काचा खायला घालून मारले

काही दुष्ट लोकांनी काचा कुटून घातलेला लाडू बाहुलीस खावयास दिला. काचांचा लाडू खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन ती मृत्यूमुखी पडली.

नमिता धुरी

पुणे : बाहुलीच्या हौदावरच्या गणपतीचे १९५२ मध्ये "सुवर्ण युग तरुण मंडळ" असे नामांतर झाले. त्यानंतर "श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती" उत्सव म्हणून तो ओळखला जाऊ लागला.

बाहुलीचा हौद अष्टकोनी होता, त्यामध्ये कात्रज तलावाचे पाणी खापरीच्या सहाय्याने आणलेले होते. त्यावर पुणे नगरपालिकेने नळ कोंढाळे बांधलेले होते. पेठेतील नागरिक तेथे पाणी भरायचे, अंघोळीला यायचे, गणेशोत्सवापूर्वी या बाहुलीला रंग देत असत. तिच्या भोवती कुंड्या लावून सजावट करीत असत.

हौदात एक कारंजे होते, त्यावर चक्र लावून पिंगपाँगचा चेंडू ठेवला जायचा, या हौदासमोर मंडळाचा उत्सव पार पडायचा म्हणून या गणेशोत्सवाला नाव होते ‘बाहुलीच्या हौदाचा गणपती’.

साक्षरतेसाठी बळी गेलेल्या अवघ्या नऊ वर्षांच्या काशिबाईंची सव्वाशे वर्षांपासून जतन केलेली बाहुलीच्या रुपातील ऐतिहासिक स्मृती बुधवार पेठेतील फरासखाना परिसरातून अदृश्य झाली आहे. खांद्यावर कळशी घेतलेली, कुरळ्या केसांची ही बाहुली अनेक वर्षे तेथील हौदावर होती.

काशीबाई शाळेत जात होती म्हणून १८९९ मध्ये पुण्यात तिची हत्या करण्यात आली होती. काशिबाई म्हणजे सत्यशोधक चळवळीचे पहिले अध्यक्ष डॉ. विश्राम रामजी घोले यांची कन्या. डॉ. विश्राम घोले मोठे शल्यविशारद होते. ते माळी समाजातील मोठे प्रस्थ, पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समिती अध्यक्ष होते.

घोले हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि फॅमिली डॉक्टर होते आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते समाज सुधारक होते. महात्मा फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी स्त्रीशिक्षणाची मोहीम आपल्या खांद्यावर घेतली. आपल्या घरातून सुरुवात करण्यासाठी त्यांनी आपली लाडकी कन्या काशिबाई हिला शिकवण्यास सुरुवात केली. लाडाने तिला ‘बाहुली’ म्हटले जायचे.

डॉ. घोले साक्षरतेचे कट्टर समर्थक होते, स्त्री शिक्षणाबाबत आग्रही होते. म्हणूनच लाडक्या बाहुलीला त्यांनी शाळेत घातले. अतिशय हुशार कुशाग्र आणि चुणचुणीत बाहुलीच्या शिकण्याला डॉ. घोले यांचे पाठबळ असले तरी समाजातील काही व्यक्तींना त्यांची ही कृती नापसंत होती, किंबहुना प्रखर विरोध होता.

अनेकदा मान्यवरांनी डॉ. घोले यांना समजावण्याचा प्रयत्न केला. बहिष्कृत करण्याची धमकी दिली. पण डॉ.घोले यांनी त्यांना कुठलीही भीक घातली नाही. शेवटी काही दुष्ट लोकांनी काचा कुटून घातलेला लाडू बाहुलीस खावयास दिला. काचांचा लाडू खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन ती मृत्यूमुखी पडली.

स्त्री शिक्षणाचा पहिला बळी

उद्विग्न झालेल्या बाहुलीच्या पित्याने म्हणजे डॉ. विश्राम घोले यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ "बाहुलीचा हौद" बांधला आणि तो सर्व जातीधर्मांतील लोकांसाठी खुला ठेवला. त्याचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर समाज सुधारक "दादा भुतकर" यांच्या हस्ते झाला. पुण्यात भुतकर हौद सुद्धा आहे.

घरासमोरच बांधलेला हा हौद ‘‘बाहुलीचा हौद’’ म्हणून ओळखला जायचा. १०० वर्षांहून अधिक काळ हा हौद बुधवार पेठेतील कोतवाल चावडीजवळ अस्तित्त्वात होता. रस्तारुंदीकरणासाठी कोतवाल चावडी १९९५ मध्ये जमीनदोस्त करण्यात आली. त्यावेळी बाहुलीची ऐतिहासिक स्मृती फरासखान्यासमोर हलविण्यात आली.

सध्या अक्षररुपात या हौदावर काशिबाईंच्या आठवणी जतन करुन ठेवल्याचे पाहायला मिळते. पुस्तक हे शिक्षणाचे प्रतीक असल्याने ग्रंथाच्या आकारातील संगमरवरातील फरशी या हौदावर लावण्यात आली आहे. त्यावर काशिबाईंचा हौद असे लिहिलेले आहे.

साक्षरतेसाठी बळी गेलेल्या या बालिकेची ऐतिहासिक आठवण भावी पिढीला पाहायला मिळणे कठीण आहे. हा हौद डॉ. विश्राम रामजी घोले यांनी आपली प्रिय कन्या काशीबाई हिच्या स्मरणार्थ बांधला, असे त्यावर लिहिले आहे.

डॉ. विश्राम घोले हे पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. ते समाज सुधारक होते. महापालिकेच्या औद्योगिक प्रशालेसाठी व कात्रजच्या तलावासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT