Shivaji Maharaj Sakal
महाराष्ट्र बातम्या

Promise Day: बाजीप्रभूंनी शिवरायांना दिलेलं वचन ते राजा हरिश्चंद्र; या Promisesने घडवला इतिहास

सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देत प्रपोज करत असतात. रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, किस डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे नंतर आठवड्याचा शेवट होतो तो व्हॅलेंटाईन डे वर. तर आज प्रॉमिस डे आहे. प्रत्येकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला आजच्या दिवशी वचन देत असतो.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्याला आयुष्यभर साथ देण्यासाठीचे हे वचन असते. तर अनेकदा अनेक वचन पूर्ण होत नसतात. पण आत्ताच नाहीतर जुन्या काळातही प्रॉमिसमुळे इतिहास घडल्याचे किस्से आजही उपलब्ध आहेत. याच वचनाचा आज आपण आढावा घेणार आहोत.

बाजीप्रभू देशपांडेंनी शिवाजी महाराजांना खिंड लढवण्याचे दिलेले वचन

अफजलखानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांच्या साम्राज्यावर आक्रमण करत मोठा मुलूख जिंकून घेतला होता. पण ज्यावेळी ते पन्हाळ्यावर होते त्यावेळी मुघल सरदार सिद्दी जौहर याने पन्हाळ्याला वेढा टाकला. त्यावेळी शिवाजी महाराज अडचणीत सापडले होते. पण शिवाजी महाराज आपल्या काही मावळ्यांसोबत शिताफीने सुटले. पण मुघलांना चुणूक लागताच त्यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यांचा पाठलाग केला.

पुढे घोडखिंडीत शिवाजी महाराज थांबले. यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराजांना वचन दिले. ते म्हणाले, "राजे तुम्ही पुढे व्हा... तुम्ही विशाळगडापर्यंत पोहचेपर्यंत मी खिंड लढवेन असं वचन देतो" असं वचन त्यांनी दिलं आणि शेवटी या लढाईत बाजीप्रभू धारातिर्थी पडले पण त्यांनी दिलेलं वचन पूर्ण केलं.

राजा हरिश्चंद्राने स्वप्नातच केले वचन पूर्ण

राजा हरिश्चंद्राने एकदा रात्री स्वप्नात एका व्यक्तीला आपले राज्य दान केले होते आणि त्यानंतर तो आपल्या मुलांबाळासोबत वनवासी निघून गेला होता. पण प्रत्यक्षात उठल्यावरही त्याने स्वप्नातील वचन पूर्ण करत सदर व्यक्तीला खरोखर राज्य दान केले आणि तो कुटुंबासमवेत वनवासी निघून गेल्याचं सांगितलं जातं.

असे अनेक घटना इतिहासात होऊन गेल्या आहेत. त्यावेळी दिलेल्या वचनावर समोरच्या व्यक्तींचा तेवढा विश्वासही होता. अनेकदा दिलेल्या वचनामुळे एखाद्याचं आयुष्य संपल्याचाही किस्सा आपण कित्येकदा ऐकला असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT