महाराष्ट्र बातम्या

Balaji Travels: पंक्चरवाला झाला सात लक्झरी कारचा मालक; आता स्वप्न हेलिकॉप्टरचे, वेड लावेल अशी सक्सेस स्टोरी

जिद्दीच्या जोरावर घेणार हेलिकॉप्टरची भरारी

सकाळ डिजिटल टीम

करंजी: एक पंक्चरवाला कुटुंब चालवून जास्तीत जास्त एखादी चारचाकी घेण्यापर्यंत मजल मारू शकतो. मात्र, पाथर्डी तालुक्यातील तरुणाने प्रगती केली. या तरुणाकडे आज आलिशान सात लक्झरी कार असून, हेलिकॉप्टर घेण्याचे स्वप्न तो पाहत आहे.

पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथील महेश बबन वाघ (वय ३३) हा तरुण या खेडेगावातील छोटेसे जनरल स्टोअर्स व त्याला जोडून पर्याय म्हणून दुचाकी किंवा छोट्या चारचाकी वाहनांचे पंक्चर काढण्याचे काम करत असे.

वडील बबन वाघ शेती व दुचाकी खरेदी-विक्री करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत. महेश हा चंचल बुद्धिमत्तेचा होता. टापटीप राहणीमानामुळे त्याच्याकडे मित्रही आकर्षित होत असत. पंक्चर काढत असताना महेशने काही पैसे वाचवत चारचाकी घेण्याचा आग्रह वडिलांकडे धरला.

वडील म्हणाले, की पैसे नाहीत, विचार डोक्यात आणू नको. मात्र, महेशने पंक्चर काढून जपून ठेवलेले पैसे वडिलांना दिले. मात्र तेवढ्या पैशांमध्ये चारचाकी येत नव्हती. महेशने हट्ट केल्यामुळे वडिलांनी महेशच्या आईचे मंगळसूत्र मोडून त्याच्या पैशातून एक मारुती व्हॅन, तीही जुनी विकत घेतली.

त्या व्हॅनवर महेश ड्रायव्हरकी शिकला. त्यानंतर शेतात जरबेरा फुल शेतीची लागवड केली. जरबेरा फुले औरंगाबाद येथे घेऊन जात आणि विकत असे. अशातच महेशचे लग्न ठरले. महेशजी जिद्द होती की आपल्या लग्नात मर्सिडीज, बीएमडब्ल्यू अशी भारी कार लावायची.

मात्र ती मिळाली नाही. यादरम्यान तिसगाव येथील डॉक्टर समर रणसिंग यांच्याकडे बीएमडब्ल्यू होती, त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी लगेच मान्य केली.

लग्नासाठी कार देऊ केली होती पण मात्र अचानक आलेल्या अडचणीमुळे कार मिळाली नाही. त्यामुळे आयुष्यात लक्झरी कार घ्यायच्या असे ठरविले.

पहिली बीएमडब्ल्यू २०१७ मध्ये घेतली. पहिले भाडे सचिन तेंडुलकरचे मिळाले. दुसरी ऑडी, मर्सिडीज, रेंजरोव्हर, जग्वार, फॉर्च्युनर अशा सात गाड्या आहेत.

या दरम्यान महेशने बालाजी लक्झरी कार्स सर्व्हिस म्हणून ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले. अभिनेते, क्रिकेटर असे अनेकांचे भाडे मिळू लागले. पुणे, मुंबई परिसरात बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रसिद्ध झाले अन व्यावसायात भरभराट होत गेली.

स्वप्न हेलिकॉप्टरचे...

कार झाल्या, आता स्वतःच हेलिकॉप्टर घ्यायचं त्यांच स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी बुकिंगही केले आहे. मात्र थोडीशी अडचण आहे ती दूर झाली की स्वतःचं हेलिकॉप्टर होणार असल्याचे महेश अभिमानाने सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT