Balasaheb Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरेंनी चक्क हिंदी सिनेमात केलं होतं काम; मनसेने शेअर केला दुर्मिळ Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा आणखी तीन दिग्गजांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर मनसेकडून एक मागणी करण्यात येतेय. स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी मनसेने लावून धरली आहे. त्यासंबंधी सोशल मीडियावर मोहीमदेखील सुरु करण्यात आलीय. 'मनसे अधिकृत' या मनसेच्या फेसबुक पेजवरुन एक व्हीडिओ शेअर करण्यात आलाय.

संतोष कानडे

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा आणखी तीन दिग्गजांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर मनसेकडून एक मागणी करण्यात येतेय. स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी मनसेने लावून धरली आहे. त्यासंबंधी सोशल मीडियावर मोहीमदेखील सुरु करण्यात आलीय. 'मनसे अधिकृत' या मनसेच्या फेसबुक पेजवरुन एक व्हीडिओ शेअर करण्यात आलाय.

व्हिडीओबद्दल लिहितांना मनसेने म्हटलं की, स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी कधी चित्रपटात काम केलं होतं का? तर त्याचं उत्तर 'हो' आहे... ठाकरे घराण्याचं आणि कलावंतांचं नातं काल-परवाचं नाही तर ते गेल्या ४ पिढ्यांचं आहे. आचार्य अत्रे ह्यांच्या आग्रहास्तव प्रबोधनकार ठाकरे ह्यांनी प्रथम 'राष्ट्रीय पुरस्कार' विजेत्या 'श्यामची आई' या मराठी चित्रपटात अभिनय केला होता हा किस्सा सर्वश्रुत आहेच. परंतु बाळासाहेब ठाकरे ह्यांनीही एका चित्रपटात काम केलं आहे, हे तितकंसं कुणाला ज्ञात नाही.

पोस्टमध्ये मनसेने पुढे म्हटलंय की, मार्मिक सुरु होण्यापूर्वी बाळासाहेब व्यंगचित्रांशिवाय बोधचिन्ह, चित्रचिन्ह, चित्रपटाचे पोस्टर्स, जाहिराती असं सर्व काही काम करायचे. बड्या चित्रपट निर्मिती संस्थांची बोधचिन्हही त्यांनी घडवली होती. तेव्हांचच एक लक्षवेधी काम म्हणजे चित्रपटात झळकणं... हो, गुरुदत्त ह्यांनी दिग्दर्शित केलेला आणि मुख्य भूमिका साकारलेल्या चित्रपटात बाळासाहेबांनी शब्दशः हातभार लावला होता.

'या' चित्रपटात केलं काम

'मिस्टर आणि मिसेस ५५' ह्या १९५५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात नायक गुरुदत्त ह्यांनी व्यंगचित्रकाराची भूमिका वठवली आहे. चित्रपटात कुठे ना कुठे गुरुदत्त त्यांना व्यंगचित्र काढताना दाखवणं क्रमप्राप्त होतं. म्हणून चित्रपटातील एका प्रसंगात गुरुदत्त व्यंगचित्र रेखाटताना दाखवले आहेत. त्या फ्रेममध्ये चित्र रेखाटताना गुरुदत्त ह्यांचा क्लोजअप आहे पण जेव्हा कॅमेरा चित्राकडे वळतो तेव्हा जो रेखाटतानाचा हात आहे तो २९ वर्षीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे. त्या चित्रातील फटकारे, शैली पाहिल्यानंतर तुम्हालाही हे जाणवेल. त्यातली रेषा आणि शैली बाळासाहेबांचीच आहे.

पोस्टमध्ये पुढे सांगितलं की, आता ह्याला कर्मधर्मसहयोग म्हणा किंवा अजून काही. पण चित्रपटात नायकाने ते व्यंगचित्र एका आडमुठ्या व्यक्तीविरोधात काढलं होतं आणि ते वृत्तपत्रात प्रकाशित झालं होतं. त्यानंतर ज्या प्रवृत्तीविरोधात चित्र काढलं त्यांचा तिळपापड होणं स्वाभाविक होतं. हेच बाळासाहेबांनी राजकीय व्यंगचित्रकार आणि नेता म्हणून राजकारण्यांच्याबाबतीत केलं.

मात्र, त्यात एक गोष्ट सर्वांच्याच कल्पनेपलीकडली झाली ती म्हणजे एक व्यंगचित्रकार चित्रांच्या माध्यमातून जनमानस चेतवतो, त्यांचं रूपांतर संघटनेत होतं, अनेक सामान्य घरातील माणसं सत्तेच्या पदापर्यंत पोहोचतात आणि स्वतःच्या संघटनेची राज्यावर सत्ता येते. व्यंगचित्रकार ते राज्यकर्ता हा प्रवास इतका विलक्षण आहे की, नंतर 'बाळासाहेब ठाकरे' हे व्यक्तिमत्त्वच चित्रपटाचा विषय बनतं. चित्रपटसृष्टीतलं एक असंही वर्तुळ बाळासाहेबांनी पूर्ण केलं होतं हे विशेष, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना 'भारतरत्न' सन्मान मिळायलाच हवा! अशी मागणी शेवटी करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT