Balasaheb thackeray memorial controversy over cm eknath Shinde visit purification from uddhav Thackeray group  
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून पुन्हा वाद! शिंदे गटाकडून अभिवादन तर ठाकरे गटाकडून शुध्दीकरण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: बाळासाहेबांचे खरे वारसदार कोण यावरून मागच्या काही दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर ठाकरे आणि शिंदे गटात नेमके बाळासाहेब कोणचे यावरून वाद पेटला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेत्यांसोबत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जात आभिवादन करण्यात केलं. यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळाच्या परिसरात गोमूत्र शिंपडल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी स्मृतिस्थळावर जाऊन असेच अभिवादन केल्यानंतर देखील असाच प्रकार समोर आला होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथेली स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे अभिवादन केले. उद्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्मतिदिनाच्या आधल्याच दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर काही वेळातच ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी गोमूत्र शिंपडून परिसराचे शुध्दीकरण केलं.

बाळासाहेब ठाकरे नेमके कोणाचे हा वाद मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरू आहे. यादरम्यान उद्या ठाकरे गटाचे नेते स्मृतिस्थळावर येणार आहेत. त्यावेळी कुठलाही वाद होऊ नये म्हणून आजच शिंदे गटाच्या आमदार, खासदारांनी स्मृतिस्थळाला भेट दिली. दरम्यान यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी येत स्मृतिस्थळाचे गोमूत्र शिंपडून शुध्दीकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT