pik-karj esakal
महाराष्ट्र बातम्या

थकबाकीदार शेतकऱ्यांना बॅंकांकडून नोटीस! आता 'सिबील'वर पीक कर्ज

आता नोड्यूजऐवजी 'सिबिल'चा स्कोअर पाहून बॅंकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज व मॉर्टगेज लोन दिले जात आहे.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : तालुक्‍यातील बॅंका व पतसंस्थांकडून येणेबाकी नसल्याचा दाखला (नोड्यूज) घेऊन आल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात होते. परंतु, त्यातही बनावटगिरी होत असल्याचा अनुभव अनेकदा बॅंक अधिकाऱ्यांना आला. तसेच खासगी फायनान्स कंपन्या, खासगी पतसंस्थांकडूनही संबंधिताने कर्ज घेऊन तो थकबाकीत गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता नोड्यूजऐवजी 'सिबिल'चा स्कोअर पाहून बॅंकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज व मॉर्टगेज लोन दिले जात आहे.

राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडून दरवर्षी राज्यातील 70 ते 80 लाख शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामात जवळपास 60 हजार कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्टे ठरवून दिले जाते. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांचा शेती कर्जवाटपाचा टक्‍का आता वाढला आहे. पण, बॅंकांकडून संबंधिताच्या 'सिबिल'वर बोट ठेवले जात आहे. कर्ज मागणीवेळी शेतीचा सात-बारा उतारा, शेतातील पिकांची नोंद असलेला उतारा आणि तो शेतकरी कोणत्याही ठिकाणी थकबाकीत नसल्याची खात्री करण्यासाठी त्याचा 'सिबिल' रिपोर्ट पडताळून पाहिला जात आहे. खासगी फायनान्सकडून कर्ज घेऊनही त्याने वेळेत परतफेड केली नसल्यास त्या शेतकऱ्याला कर्ज दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. पीक कर्जासह त्या शेतकऱ्याला शेती तारण कर्ज हवे असल्यास त्याचे मागील व्यवहार पडताळून पाहिले जातात. तसेच तो 2008 पासून झालेल्या तिन्ही कर्जमाफीचा लाभार्थी आहे का, याचीही खात्री केली जात आहे. त्यावरून संबंधित शेतकऱ्याची कर्ज परतफेडीची मानसिकता पाहिली जात असल्याचे चित्र आहे.

दोन लाखांवरील थकबाकीदारांना नोटीस
महागाई, शेती मशागतीसह बियाणे, खतांच्या किंमती वाढल्याने आता 1 एप्रिलपासून पीक कर्जाची मर्यादा वाढविली जाणार आहे. दुसरीकडे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन हंगामापूर्वी (एक वर्षांत) कर्जाची परतफेड अथवा नवे-जुने करणे अपेक्षित आहे. दरम्यान, दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेने अजूनपर्यंत कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यांना नव्याने कर्ज मिळणे बंद झाले आहे. बॅंकांकडून त्या कर्जदारांना वसुलीच्या नोटीस बजावल्या जात आहेत. परंतु, कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी कर्ज परतफेडीला नकार दिल्याचे बॅंकांचे अधिकारी सांगत आहेत.

दोन लाखांवरील थकबाकीदारांची संख्या वाढली असून कर्जमाफी मिळेल म्हणून ते थकबाकी भरत नसल्याची वस्तुस्थिती आहे. कर्ज मागणारा शेतकरी कोणत्याही वित्तीय संस्था, फायनान्स कंपन्यांचा थकबाकीदार नसावा, जेणेकरून त्याला कर्ज मिळण्यास अडचणी येतील. 650 पेक्षा अधिक सिबिल स्कोअर असलेल्या शेतकऱ्याला लगेच कर्ज मिळते.
- प्रशांत नाशिककर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT