Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: "दिल्लीत बायकोची पर्स फिरवत बसायला मी एवढा लेचापेचा आहे का?"; सुप्रिया सुळेंच्या टिकेचा अजितदादांनी घेतला समाचार

Ajit Pawar: बारामतीत पवारसाहेबांच्या उपस्थितीत लोकसभा असो अथवा विधानसभेची निवडणूकीत एकच शेवटची सभा होत होती

कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

Ajit Pawar

माळेगाव: "दिल्लीत बायकोची पर्स फिरवत बसायला मी एवढा लेचापेचा नेता आहे का?  मी बारा गावचं पाणी पिलो आहे आणि इतरांनाही पाजतो आहे,  हे महाराष्ट्राला माहिती आहे.  त्यामुळे समोरच्यांनी टिका करताना काहीतरी विचार करावा. मी इतरांवर टिका करण्यापेक्षा विकास कामांना अधिक महत्व देतो. विकासाच्या मुद्दावर आणि बारामतीकरांच्या पाटींबाने माझी पत्नी सुनेत्रा पवार निवडून येणारच आहे," असा ठाम विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंचे नाव न घेता त्यांच्या टिकेचा समाचार घेतला.

लोकसभा निवडणूकीत खडकवासला घड्याळाला एक लाखांचे लिड देणार आहे, बारामतीकारांसह इतर तालुक्यातही भावनिक न होता विकास डोळ्यासमोर ठेवून घड्याळ चालवावे, असेही आवाहन उपस्थितांना करण्यास अजित पवार यावेळी विसरले नाहीत.

देशाचे भवितव्य घडविणारी लोकसभा निवडणूक आहे. देशाची प्रगती आणि १४० कोटी जनतेची सुरक्षितता आदी विकसनशिल गोष्टींना मतदारांनी प्रधान्य द्यावे, असे आवाहन करीत अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादी पक्षाची ८० टक्के आमदार, खासदार आणि कार्यकर्ते भाजप विचाराबरोबर गेले आहेत. नेमकी हीच बाब निवडणूक आयोगाने मान्य केली आणि राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह आम्हाला दिले. त्यामुळे पवारसाहेबांनी पक्ष चोरून नेला असे म्हणणे चूकीचे आहे. वास्तविक पवारसाहेबांनीच २०२४ चा पंतप्रधान मोदीसाहेब पुन्हा होणार, असे सांगितले होते. त्यानुसार शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार कायम ठेवून भाजपबरोबर जाण्याचे ठरले होते. परंतु साहेबांनी ऐनवेळी भूमिका बदली. त्या गोष्टीचा त्यांच्यासह सर्वांनाच त्रास होत आहे." 

बारामतीत पवारसाहेबांच्या उपस्थितीत लोकसभा असो अथवा विधानसभेची निवडणूकीत एकच शेवटची सभा होत होती, अशी आठवण करून देत अजित पवार म्हणाले, "पवारसाहेब आता बारामतीमध्ये वाडीवस्तीवर सभा घेत फिरतात. त्याचे मनाला खपू वाईट वाटते. आजवर बारामतीकर पवार कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, आताही तुम्ही पवारांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहाल, याचा मला विश्वास वाटतो."

काँग्रेसने अनेकदा कायद्यात बदल केला...!

अजित पवार म्हणाले, "पंतप्रधान मोदीजींनी भारताची प्रतिमा जगात उंचविली. काॅग्रेससह इंडीया आघाडीचे लोक दिशाभूल करीत म्हणतात की यापुढे निवडणूक होणार नाही, संविधान वाचणार नाही. वास्तविक काॅग्रेसच्या काळात स्व. इंदिरा गांधी,  स्व. राजिव गांधी, मनमोहन सिंग आदींच्या कारकिर्दीमध्ये १०६ पेक्षा जास्त वेळा गरजेनुसार कायद्यामध्ये बदल झाला. त्यातुलनेत मोदीसाहेबांनी ३७० कलम हटविले व विविध धोरणात्मक निर्णय घेतले. त्यामुळे देशातील संविधानाला धोका आहे, असे म्हणणे कितपत योग्य आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT