Baramati Lok Sabha Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

Baramati Lok Sabha Election: ताई की वहिनी? पवार घराण्यातील हाय व्हॉल्टेज लढतीमागे आहे मोठा इतिहास, काय आहे बारामतीची समीकरणे, जाणून घ्या

Baramati Lok Sabha Election: बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे आता पवार विरूध्द पवार अशा लढतीवर देशाचं लक्ष लागून राहणार आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेलं आहे. 2019 मध्ये अमेठीत राहुल गांधी यांचा पराभव करून भाजपने काँगेसच्या गडाला सुरूंग लावला. त्यानंतर भापने आपला मोर्चा वळवला तो शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. A फॉर अमेठी आणि B फॉर बारामती असे म्हणत भाजपने अमेठी पॅटर्न राबवण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं आहे.

बारामती लोकसभेसाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी भोर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे आता पवार विरूध्द पवार अशा लढतीवर देशाचं लक्ष लागून राहणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभांचा समावेश आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर- हवेली, भोर, आणि खडकवासला या सहा मतदारसंघाचा समावेश होतो. मात्र दोन्ही उमेदवारांसाठी बारामतीचा मतदार का महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आत्ता मिळाले मागील लोकसभेच्या निकालांचे विश्लेषण केले तर समजते 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना महादेव जानकर यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून 90628 मतांचे लीड मिळाले होते.

तसेच इंदापूर विधानसभा मतदारसंघातून 21693 मतांचे लीड मिळाले होते. आणि भोर विधानसभा मतदारसंघातून 16885 मतांचे लीड मिळाले होते. मात्र या निवडणूकीत सुप्रिया सुळे फक्त 69719 मतांनी विजयी झाल्या होत्या. म्हणजेच बारामतीकरांनीच सुप्रिया सुळे यांना खासदार केले असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

2019 चा विचार केला तर बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना 127918 मतांचे लीड मिळाले होते. तर इंदापूर विधानसभा मतदार संघातून 70938 मतांचे लीड मिळालं होतं. याशिवाय पुरंदर मधून 9681 आणि भोर विधानसभा मतदारसंघातून 19004 मतांचे लीड मिळाले. तेव्हा सुप्रिया सुळे 155774 मतांनी खासदार झाल्या. याचा अर्थ 2019 मध्ये सुप्रिया सुळे यांना इतर पाच मतदारसंघातून अवघे 27856 मतांचे लीड मिळाले होते. यावेळी देखील सुप्रिया सुळे यांना बारामतीकरांनीच खासदार केले.

दुसरी गोष्ट म्हणजे 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाने OBC उमेदवार देत 44134 मतं खाल्ली. यामध्ये या उमेदवाराला सर्वाधिक म्हणजे 10458 मतं इंदापूर विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती. त्यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि तत्कालीन आमदार दत्तात्रय भरणे यांनी आघाडी म्हणून सुप्रिया सुळे यांना मदत केली होती.

2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अधिक प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे असं म्हणू शकतो की बारामतीवर ज्यांची कमांड तोच भावी खासदार होवू शकतो.

बारामती लोकसभा मतदारसंघाचे जातिय समीकर पाहिले तर मराठा समाज साधारणपणे 40% आणि OBC समाज 38% च्या आसपास आहे. त्यामुळे मराठा समाज विभागला जाणार हे समीकरण आहे. मात्र OBC समाज कोणाच्या पारड्यात मत टाकणार यावर निकाल अवलंबून राहू शकतो.

OBC समाजाचे नेते राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात अधिक असल्याचे दिसून येत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दत्ता भरणे त्यामुळे अजित पवार यांचे पारडं सध्या तरी जड दिसून येत आहे.

मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील नेते, शेतकरी, आणि मराठा समाजावर शरद पवार यांचा प्रभाव असल्याचे बोलले जाते. तसेच अजित पवारांनी केलेली बंडखोरी आणि शरद पवारांकडून गेलेला पक्ष यांमुळे शरद पवार यांची सहानभुती या मतदारसंघात जाणवते. त्यामुळे ही लढत अतिशय चुरशीची होणार यात काही शंकाच नाही.

या नेत्यांची भूमिका काय असणार?

इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचा राजकीय संघर्ष राज्याला माहित आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार हे देखील पाहणं तितकचं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर माजी मंत्री विजय शिवतारे यांना पराभूत करण्यात आणि संजय जगताप यांना विजयी करणात अजित पवार यांची महत्त्वाची भुमिका होती. त्यामुळे पुन्हा आमदार होण्यासाठी विजय शिवतारे अजित पवार यांना मदत करणार की झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कुरघोड्या करणार, याशिवाय संजय जगताप हे अजित पवारांनी केलेल्या मदतीची परत फेड करून अंतर्गत मदत करणार का, आगामी संधी पाहून महाविकास आघाडीचे काम प्रमाणिक करणार..?

दौंड विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर 2009 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल कूल यांच्या विरोधात अपक्ष उमेदवाराला अंतर्गत मदत केली होती. असे स्थानिक लोक सांगतात. त्यामुळे विद्यमान आमदार राहुल कूल पक्ष आदेश मानणार की त्या पराभवाचा वचपा काढणार हे पाहणं देखील तितकच महत्त्वाचं ठरणार आहे, त्यामुळे सध्या तरी कोणाचं परडं जड हे सांगणं जरा अवघड आहे. मात्र हे नेते या निवडणूकीत काय भूमिका घेणार यावर देखील अनेक समीकरणं अवलंबून आहेत.

बारामती लोकसभेचा इतिहास? (Baramati Lok Sabha Election History)

बारामतीमधून 1957 साली काँगेसचे केशवराव जेधे हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले. तेव्हापासून 1977 चा अपवाद वगळता कायमच ही जागा काँग्रेस आघाडीकडे राहिली आहे. गेली तीन टर्म खासदार सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात जोरदार तयारी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT