CM Eknath Shinde in vasai sakal
महाराष्ट्र बातम्या

Barsu Refinery Project : कोणत्याही परिस्थितीत लोकांवर प्रकल्प लादणार नाही - CM एकनाथ शिंदे

समृद्धी महामार्गालाही पूर्वी विरोध होता, पण आता तो प्रकल्प उभा राहिला आहे.

वैष्णवी कारंजकर

Barsu Refinery Protest : राज्यात सध्या बारसू इथं होणाऱ्या रिफायनरीवरुन वादंग सुरू आहे. अशातच भूमिपूत्र आणि स्थानिकांवर कोणताही प्रकल्प लादणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. या प्रकल्पावरुन बारसू ग्रामस्थांकडून आंदोलन सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "कोणताही प्रकल्प लोकांवर अन्याय करून लादणार नाही. समृद्धी महामार्ग जो आपल्या सरकारने केला, त्यालाही पूर्वी विरोध झाला होता, पण नंतर लोकांनी परवानगी दिली आणि हा महामार्ग झाला. तसंच बारसूतले शेतकरी, भूमिपुत्र यांना विचारात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

शिंदे पुढे म्हणाले, " प्रकल्प लगेचच उभारला जाणार नाही. तिथे आधी बोअर करण्याचं काम सुरू आहे. मातीची चाचणी होईल, इतर तपासण्या होतील. लगेच प्रकल्प उभा राहणार आहे का तर नाही. पुढच्या अनेक प्रक्रिया आहे. पण कोणत्याही परिस्थिती आपलं सरकार भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT