रत्नागिरीतील बारसू रिफायनरी विरोधात आज मोर्चा निघणार आहे. बारसू रिफायनरी विरोधातील मोर्च्याचं बारसूच्या माळरानावर आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. बारसु रिफायनरी मुद्यावरुन ठाकरे पवारांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले. त्यामुळे मविआमध्ये फूट पडण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तवण्यात येत आहे. (Barsu Refinery Project Thackeray against Sharad Pawar maharashtra politics
काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारसु रिफायनरी मुद्यावर भाष्य करताना तेथिल स्थानिक लोकांना विश्वासात घ्या, असं विधान केलं. मात्र, ठाकरे गटाने विरोधी भूमिका दर्शवली आहे.
आज सकाळी संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी आपली भूमिका मांडली.
काय म्हणाले राऊत?
शरद पवार यांच मी काल ऐकलं स्थानिक लोकांना विश्वासात घ्या त्यांच्याशी चर्चा करा.. म्हणजे काय करायचं? असा उलट सवाल राऊतांनी केला.
स्थानिक लोकांचा सरकारवर विश्वास नाही. उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्लीचा आग्रह होता म्हणून पर्याय आम्ही सूचवला. पण ती जागा घेण्यासाठी मविआने कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. उद्धव ठाकरेदेखील जाणार आहेत.
हे प्रकरण चिघळण्याआधी, सर्वेक्षण आणि भूसंपादन राज्य सरकारनं मागे घ्यावे.
पवार काय म्हणाले होते?
प्रकल्पासंदर्भात स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता.
'बारसूत सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी मी उदय सामंत यांना आंदोलक आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी यांची बैठक बोलावण्याची सूचना केली होती. ही सूचना सामंत यांनी तत्काळ मान्य करत उद्याच आम्ही सदर जागेवर अशी बैठक घेऊ, असं मान्य केलं आहे,' अशी माहिती शरद पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.
तसेच, स्थानिक लोकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. त्यांचा विरोध असेल तर विरोध का आहे हे समजू घेणे गरजेचे आहे. विरोधाची कारणं लक्षात घेऊन मार्ग काढा. स्थानिकांच्या भावना तीव्र असतील तर नोंद घेतली पाहिजे.', असं शरद पवारांनी यावेळी सांगितले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.