sakal-exclusive sakal
महाराष्ट्र बातम्या

‘बी.एड’ आता एक, २ अन्‌ ४ वर्षांचे! पण, यंदा B.Ed, D.Edला पूर्वीप्रमाणेच घेता येईल प्रवेश

‘B.Ed’चा कालावधी एक (4 वर्षांचे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केलेल्यांसाठी), 2 (कोणत्याही विषयातील बॅचलरीची पदवी घेतलेल्यांसाठी) आणि 4 वर्षांचा (बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी थेट) असणार आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पण, डी.एड. आणि बी.एड. कॉलेजसंदर्भात राज्य शासनाकडून कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याने ते कॉलेज आणखी तीन-चार वर्षे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. भविष्यात मात्र शिक्षक होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा इंटिग्रेटेड ‘बी.एड.’चा कोर्सच करावा लागणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०३० पर्यंत राज्यात पूर्णपणे सर्वच वर्गांसाठी लागू होईल. कौशल्य विकास, संधोशन व विद्यार्थ्यांच्या आवडीला त्यात प्राधान्य देण्यात आले आहे. यावर्षी राज्यातील १३ अकृषिक विद्यापीठात त्याची अंमलबजावणी होईल.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायाधीश जे. एस. वर्मा आयोगाच्या मते, दहा हजारांपेक्षा जास्त संख्या असलेल्या स्वतंत्र डी.एड, बी.एड महाविद्यालयांपैकी बहुतेक सर्वच ठिकाणी शिक्षकांच्या शिक्षणाचा गंभीरपणे प्रयत्न सुद्धा होत नाही. पैसे घेऊन पदव्या विकल्या जातात. आतापर्यंतचे नियामक प्रयत्न या व्यवस्थेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी तोकडे ठरले आहे. गुणवत्तेची मूलभूत मानकेसुद्धा लागू करू शकलेले नाहीत.

वास्तविक पाहता या क्षेत्रातील उत्तमता आणि नाविन्यपूर्णतेची वाढ कमी करण्याचा नकारात्मक परिणाम, यामुळे झाला आहे. त्यामुळे या क्षेत्राचे मानदंड उंचावण्यासाठी आणि सचोटी, विश्वासर्हता, कार्यक्षमता व उच्च दर्जा पुनर्स्थापित करण्यासाठी शिक्षणाचे क्षेत्र व त्याच्या प्रणालीत बदल करावा, अशी शिफारस आयोगाने शासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत शिक्षक होण्यासाठी चार वर्षांचा इंटिग्रेटेड (बीएड) कोर्स तयार करण्यात आला आहे.

यंदा नाही, पण भविष्यात बदल होणार

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यंदापासून विद्यापीठात होईल. पण, डी.एड. आणि बी.एड. कॉलेज पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. त्यात यंदा कोणताही बदल होणार नाही, पण भविष्यात निश्चितपणे बदल होईल.

- डॉ. रजनीश कामत, प्रभारी कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

एक, दोन अन्‌ चार वर्षांचे बीएड असणार

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा एकात्मिक ‘बी.एड’ अभ्यासक्रम म्हणजे शिक्षण तसेच इतिहास, संगीत, गणित, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, कला, शारीरिक शिक्षण अशा एका विषयात स्पेशलायझेशन असलेली ड्यूएल मेजर सर्वांगीण पदवी असेल.

तसेच शिक्षकांच्या शिक्षणात अत्याधुनिक अध्यापनशास्त्राबरोबरच समाजशास्त्र, इतिहास, विज्ञान, मानसशास्त्र, प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन व शिक्षण, पायाभूत साक्षरता, संख्याशास्त्र, भारत व त्याची मूल्ये, संस्कृती, कला, परंपरा, याचे ज्ञान व अशा इतर विषयांचे मूलभूत प्रशिक्षण देखील समाविष्ट असेल. ‘बी.एड’चा कालावधी एक (चार वर्षांचे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केलेल्यांसाठी), दोन (कोणत्याही विषयातील बॅचलरीची पदवी घेतलेल्यांसाठी) आणि चार वर्षांचा (बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी थेट) असणार आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी गुणवानांना शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT