Abdul Sattar Vs Aditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar: सत्तारांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख 'छोटे पप्पू' असा का केला? 'दारु प्रकरण' कृषीमंत्र्यांना भोवणार?

संतोष कानडे

मुंबईः बीडमध्ये नुकसानीची पाहाणी करण्यासाठी गेलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना ''दारु पिता का?'' असा सवाल केला होता. यानंतर सत्तारांवर विरोधकांकडून टीकास्र सोडलं जातंय.

अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना अजबच प्रश्न विचारल्याने आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा 'छोटा पप्पू' असा उल्लेख केला.

कृषीमंत्री सत्तार म्हणाले की, छोट्या पप्पूला अजून कळतच नाही की कुणाला काय विचारावं. त्यांची अनेक जुनी प्रकरणं काढली तर त्यांना फिरता येणार नाही. बीडचे जिल्हाधिकारी चांगले आहेत. त्यांना मी चहाच्या बाबतीत बोलत होतो. यापुढे आम्ही हसणं-बोलणं बंद करावं का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी सत्तार यांनी चहा पित असताना तुम्ही दारू पिता का, असा अवचित सवाल बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना केला. त्यांच्या या अनपेक्षित प्रश्नामुळे तिथे एकच हशा पिकला होता. जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर समोर मोबाईलचा कॅमेरा सुरू असल्याचं कळल्यावर सत्तार काहीसे गोंधळलेले दिसले. तसेच ''अरे अरे'' म्हणत त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डींग बंद करण्यास सांगितलं. मात्र सत्तार यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे जिल्हाधिकारी देखील दचकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्राबाहेरची 'ही' जोडी ठरली भाजपची किंगमेकर...अशाप्रकारे मिळवून दिला महायुतीला बंपर विजय

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT