Belgium Girl Marriage Indian Guy : प्रेमाला कुठे असतं बंधन? ना असते कोणती सीमा, असतं ते फक्त दोघांचं नितळ नातं. आपण बॉलिवूड मुळे अनेकदा हटक्या लव्ह स्टोरी बघतच असतो. पण सध्या एक हटकी खरी लव्ह स्टोरी व्हायरल होते आहे.
अनेकदा मुलींची अपेक्षा असते की त्यांना फॉरेन रिटर्न किंवा तिथेच काम करणारा नवरा हवा असतो. पण इकडे जरा वेगळं घडलं आहे, बेल्जियमच्या एका तरुणीच कर्नाटक मधल्या एका रिक्षा चालकशी लग्न झालं आहे.
हे प्रकरण कर्नाटकातील विजयनगर इथल्या एका ऑटो चालकाशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या मुलीचं नाव कॅमिल असून अनंतराजू असं या रिक्षा चालकाचं नाव आहे. कॅमिल ही 27 वर्षाची असून ती बेल्जियम मध्ये एक सोशल वर्कर आहे. तर अनंतराजू हे 30 वर्षाचे असून ते रिक्षा चालक आणि टुरिस्ट गाईडर आहेत.
2019 मध्ये कॅमिल आपल्या कुटुंबासह हम्पी, कर्नाटक फिरायला आली होती. तेव्हा अनंतराजू त्यांचे टुरिस्ट गाईडर बनले होते. अनंतराजू यांनीच त्यांना कर्नाटकात फिरवले शिवाय त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सुध्दा छान सोय केली. पुढे मुलगी आपल्या देशात परत गेल्यावर हे दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांचे मित्र झाले आणि दोघांमधली जवळीक हळूहळू वाढू लागली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल.
कॅमिलला भारतीय संस्कृती खूप आवडली, शिवाय अनंतराजू यांच्या प्रामाणिक स्वभावानेही तिला भुरळ पाडली. तिला परत एकदा भारतात येयचे होते पण कोविड-19 मुळे येऊ शकली नाही, पण निर्बंध उठताच तिने आपले आई-वडील मारियान आणि जेम फिलिप यांना अनंतराजूशी लग्न करण्याबद्दल पटवले. दरम्यान, अनंतराजूनेही त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं. दोन्ही कुटुंबांनी संमती दाखवल्यावर, या जोडप्याने शुक्रवारी 26 नोव्हेंबला हम्पीमधल्या विरुपक्ष मंदिरात सकाळी 9.25 वाजता लग्न केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.