Anandacha Shidha esakal
महाराष्ट्र बातम्या

लाडक्या बहिणींचा आनंदाचा शिधा गोदामात पडून! 4 वस्तू देण्याच्या पिशवीवर राजकीय नेत्यांचे फोटो; अंत्योदय लाभार्थींच्या साड्या वाटपही थांबले

गौरी- गणपतीच्या सणात १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा शासन निर्णय झाला. त्यात साखर, रवा, हरभरा डाळ व तेल (प्रत्येकी एक किलो) अशा चार वस्तू आहेत. पण, विधानसभा निवडणुकीची आचारंहिता लागू झाल्याने वस्तूंच्या पॉकेटवर नव्हे तर त्या वस्तू एकत्रितपणे ज्या पिशवीतून दिल्या जातात, त्यावर सत्ताधाऱ्यांचे फोटो असल्याने आनंदाचा शिधा आता निवडणूक होईपर्यंत गोडावूनमध्येच ठेवावा लागणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील पावणेदोन कोटी शिधापत्रिकाधारकांना गौरी- गणपतीच्या सणात १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा शासन निर्णय झाला. त्यात साखर, रवा, हरभरा डाळ व तेल (प्रत्येकी एक किलो) अशा चार वस्तू आहेत. पण, विधानसभा निवडणुकीची आचारंहिता लागू झाल्याने जवळपास ३३ लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळालेला नाही. वस्तूंच्या पॉकेटवर नव्हे तर त्या वस्तू एकत्रितपणे ज्या पिशवीतून दिल्या जातात, त्यावर सत्ताधाऱ्यांचे फोटो असल्याने आनंदाचा शिधा आता निवडणूक होईपर्यंत गोडावूनमध्येच ठेवावा लागणार आहे.

राज्य शासनाने दरवर्षी बहुतेक सण- उत्सवात सामान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना अवघ्या १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचे निर्णय घेतले. मागील गौरी- गणपतीच्या उत्सवातही तसाच निर्णय झाला होता. मात्र, अनेक जिल्ह्यांना तो वेळेत उपलब्ध झाला नाही आणि आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने त्याचे वाटप थांबले आहे.

साखर, रवा, हरभरा डाळ व तेलाच्या पिशवीवर कोणत्याही राजकीय पक्षांचे फोटो नाहीत, त्यामुळे त्याच्या वाटपाला काहीही अडचणी नाहीत. मात्र, शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे त्याचे वाटप पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेल्या पिशवीत घालून करणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्या वस्तू धान्य दुकानांमध्ये असताना देखील त्याचे वाटप करता येणार नसल्याची वस्तुस्थिती आहे. दिवाळीच्या तोंडावर सामान्यांना त्या वस्तूंची गरज असून त्यावर आता शासन स्तरावरून काय पर्याय काढला जातोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासन स्तरावरून मार्ग निघू शकतो

शासन आदेशानुसार अंत्योदय लाभार्थींच्या साड्या वाटप थांबविले आहे. याशिवाय ज्यांना अजूनपर्यंत आनंदाचा शिधा मिळालेला नाही, त्यांचे वाटप आता निवडणूक होईपर्यंत करता येणार नाही. पण, त्या वस्तूंच्या पॅकिंगवर कोणत्याही राजकीय पक्षांचे फोटो नसल्याने पर्यायी पिशवी वापरून त्या वस्तूंचे वाटप करण्याचा मार्ग शासन स्तरावरून काढला जावू शकतो.

- ओंकार पाडोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर शहर

एक लाखांवर महिलांचे साड्यावाटप थांबले

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक सहा हजार ९१० महिला लाभार्थी महिलांच्या साड्या वाटप आता थांबले आहे. साड्या वेळेत उपलब्ध झालेल्या असतानाही तालुकास्तरावर त्याचे वाटप तातडीने झाले नाही. राज्यातील जवळपास एक ते दीड लाख ५२ हजार महिलांना आता निवडणुकीनंतरच साड्या मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT