Rahul Narvekar On Shivsena Mla Disqualification Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Narwekar : लंडनला जाण्यापेक्षा 'घान्या'ला गेलेलं बर; शिरसाठ यांचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर

रवींद्र देशमुख

मुंबई - मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आहे. याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. मात्र तेच आता घाना देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

शिरसाठ म्हणाले की, आपली लोकशाही काय आहे, हे सांगण्यासाठी नार्वेकर घान्याला चालले आहेत. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. घरात बसून, भांडूप, मातोश्री किंवा सामना येथे चक्रा मारण्यापेक्षा घाण्याला जावून लोकांमध्ये मिसळणं कधीही चांगल आहे. लंडनला आराम करण्यासाठी जाण्यापेक्षा घान्याला जाणं कधीही चांगलं, असं शिरसाठ म्हणाले.

केंद्रीयमंत्री अजय मोहन मिश्रा म्हणाले होते की, भाजप महाराष्ट्रात मोठा पक्ष आहे. इतर आमच्यासोबत आले, त्यांच्यामुळे आमचं काहीही नुकसान होणार नाही. त्यावर शिरसाठ म्हणाले की, भाजप राज्यात मोठा पक्ष आहे. इतरांची त्यांना गरज आहे. त्यांना कोणाची गरज नाही, असा त्यांचा समज असेल तर हे योग्य नाही.

संजय राऊत म्हणाले होते की, घाणा या शहरात देखील लोकशाही अस्थिर असते. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तिथे लोकशाहीवर प्रवचन द्यायला जात आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकशाही घाण्याला जुंपून जात आहात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तारखांवर तारखा देऊन घटनाबाह्य सरकार चालवत असल्याचंही राऊत यांनी म्हटलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan International Airlines: सुधरा रे ! पाकिस्तानी विमान पेशावरऐवजी उतरले कराचीत, प्रवाशांनी घातला गोंधळ

ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाने वन-डे मधील पाकिस्तानच्या विक्रमाची लावली वाट; इंग्लंडविरुद्ध दिसला थाट

Supreme Court Youtube : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'असले' व्हिडिओ होत आहेत शेअर

Bhutan: हॅप्पी कंट्रीमध्ये बिटकॉइनची हवा! भूतान बनला बिटकॉइनचा साठा असलेला जगातील चौथा सर्वात मोठा देश

..तरच गोवा-तमनार प्रकल्पाला मंजुरी देणार; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका, पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र

SCROLL FOR NEXT