महाराष्ट्र बातम्या

भगतसिंग कोश्यारी आले महाराष्ट्रात; देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल

संतोष कानडे

मुंबईः महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रात आले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भेट दिली. त्यांचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत.

महाराष्ट्रात आजवर सर्वात जास्त चर्चिले गेलेले आणि वादग्रस्त ठरलेले राज्यपाल म्हणजे भगतसिंग कोश्यारी. २०१९ मध्ये सरकार स्थापनेवेळी त्यांनी घडवून आणलेल्या घडामोडी विशेष चर्चिल्या गेल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात १२ आमदारांच्या निवडीचा प्रश्न त्यांनी तसाच खितपत ठेवला होता.

यासह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि मराठी माणसांबद्दल त्यांनी वादग्रस्त विधानं केली होती. शेवटी त्यांनीच निवृत्तीची मागणी केली आणि महाराष्ट्रातून काढता पाय घेतला.

रविवारी भगतसिंग कोश्यारी मुंबईत दाखल झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट दिली. आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर अद्याप निर्णय झालेला नसताना त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT