महाराष्ट्र बातम्या

Bhandara–Gondiya Lok Sabha Election Results: नाना पटोलेंनी जोर लावला अन् प्रशांत पडोळेंना जिंकून आणलं; सुनील मेंढेंना धक्का

Bhandara Gondiya constituency Result 2024 Congress Prashant Padole Winner: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने पुन्हा एकदा सुनील बाबुराव मेंढे यांना संधी दिली, तर काँग्रेसने प्रशांत पडोळे या नव्या चेहऱ्याला मैदानात उतरवले. (BJP Sunil Mendhe)

कार्तिक पुजारी

Bhandara–Gondiya election Result news: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने पुन्हा एकदा सुनील बाबुराव मेंढे यांना संधी दिली होती, तर काँग्रेसने प्रशांत पडोळे या नव्या चेहऱ्याला मैदानात उतरवले. या मतदारसंघात पडोळेंनी सुनील मेंढेंचा पराभाव केला आहे.

भंडारा-गोंदिया जिल्हा दोन नेत्यांसाठी ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल हे एकेकाळी याच मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये कोण भारी पडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरलं होतं..

उमेदवाराचे नाव ---------मिळालेली मतं------- मताधिक्य

१. डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस)- ५८७४१३ --- ३७३८०

२. सुनील मेंढे (भाजप )- ५५००३३

Sunil Mendhe Vs Prashant Padole

सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळण्यास थोडा उशीर झाला, त्यांच्या कामाबाबत लोकांमध्ये काहीशी नाराजी असल्याची चर्चा होती. पण, भाजप नेतृत्त्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला होता. दुसरीकडे, प्रशांत पडोळे हे काहीसे नवखे उमेदवार होते. त्यांच्या प्रचाराची धुरा नाना पटोले यांनीच सांभाळल्याचं दिसलं. पटोलेंनी गावोगावी जाऊन पडोलेंचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं होतं.

Bhandara–Gondiya 2019

मतदारसंघावर कोणाचा प्रभाव?

भंडारा-गोंदिया मतदारसंघाचा जन्म झाल्यानंतर याठिकाणी २००९ च्या पहिल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचा विजय झाला होता. त्यावेळी केंद्रात यूपीए-२ सरकार होते. २०१४ मध्ये भाजपने नाना पटोले यांना मैदानात उतरवले होते. नाना या ठिकाणी विजयी झाले होते. त्यानंतर २०१८ मध्ये काही कारणास्तव नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर कुकडे यांचा विजय झाला. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा पुन्हा भाजपकडे आली. याठिकाणी सुनील मेंढे खासदार झाले.

Bhandara–Gondiya

महत्त्वाचे मुद्दे

- नाना पटोले यांनी चांगला जोर लावला होता

- प्रशांत पटोले नवखे उमेदवार

- सुनील मेंढे यांच्याबाबत काही प्रमाणात नाराजी

- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा

- रखडलेला भेल प्रकल्प

२०१९ मध्ये काय होती स्थिती?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मेंढे यांना ६,५०,२४३ (५२.२३ टक्के) मतं मिळाली होती, तर एनसीपीच्या पंचबुद्धे नाना जयराम यांना ४,५२,८४९ (३६.३८ टक्के) मतं मिळाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला होता. २०२४ च्या लढतीमध्ये कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT