काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज शेगावमध्ये आहे. तर अनेकांकडून आता गांधी यांची ही यात्रा रोखण्याची मागणी लोकांकडून करण्यात येतेय. राहुल गांधी यांनी काल एका सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहे. तर आता या प्रकरणाला काय वळण मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे. आज राहुल गांधी यांनी शेगावमध्ये गजानन महाराजांचे दर्शन घेतले आहे. आणि ते पुढे सभेला संबोधित करणार आहेत.
तर काँग्रेस नेते कनैय्या कुमार यांनी सभेला संबोधित करताना म्हणाले की "भारत जोडो यात्रेचा उद्धेश हा आहे की, "ह्या यात्रेतून देशातील तमाम लोकांना या गोष्टीचा भरोसा द्यायचा आहे की, काँग्रेस पक्ष देशातील लोकांच्या आधिकारासाठी लढली होती, या देशाला आजादी मिळवून दिली होती. आणि काँग्रेस पक्ष या देशातील लोकांसाठी लढत आहे."
हेही वाचा- का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?
"आणि मिळालेल्या स्वतंत्र्य वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी तुम्हाला आग्रह आहे की, तुम्ही तुमचे मुद्दे घेवून या यात्रेत सहभागी व्हा. देशावर तुमचं प्रेम असेल तर प्रत्येक नागरिकांने यात सहभागी झालंच पाहिजे. तर ते पुढं म्हणाले की राहुल गांधी चोराला समोरच चोर म्हणतात त्यामुळं त्यांच्यावर कट रचला जात आहे." असं मत त्यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.