Bhim Army Opposed Bhide:संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधांनानंतर राज्यातील वातावरण तापलंय. विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी केली होती. या कारणावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली होती.
मात्र, राज्यात हे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पुण्यातील संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला भीम आर्मीतर्फे विरोध करण्यात आला आहे. याबद्दल या संघटनेने याबाबत पोलीसांना पत्रदेखील दिले आहे.
भीम आर्मी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची भेट घेतली आणि संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला परवनगी देऊ नये अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली. पुण्यातील बालगंधर्व चौकात शनिवारी (दि. ५ऑगस्ट) संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले जाणार आहे आणि यावेळी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेकही घातला जाणार आहे.
संभाजी भिडेंच्या याच कार्यक्रमाला भीम आर्मीने विरोध दर्षवला आहे. जर पुण्यात संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घातला आणि समर्थन आंदोलन केलं तर भीम आर्मी त्यांच्या विरोधात करणार जोरदार आंदोलन करणार, असा इशारा भीम आर्मीने दिला.
भीम आर्मीने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याने पुण्यात मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. यावेळी भीम आर्मी आणि संभाजी भिडे यांच्या समर्थकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मागच्या काही दिवसांमध्ये अनेक वादग्रस्त विधाने केली. त्यांनी आधी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं, तर महात्मा फुलेंबद्दल त्यांनी अपशब्द वापरले. त्यांनी साईबाबांबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ते म्हणाले होते की हिंदूनी साईबाबांची मुर्ती मंदिराबाहेर फेकून द्यावी.
त्यांच्या या ऑडियो क्लीप्स व्हायरल झाल्यावर राज्यातील वातावरण तापलं होतं. त्यांचे विधान जगासमोर आल्यावर त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर भिडेंच्या समर्थनार्थही मोर्चे आणि दुग्धाभिषेकाचं सत्र सुरु झालं होतं
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.