Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: सोलापूरात भाजपला मोठा धक्का! शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यासह तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भरत राष्ट्र समिती हा पक्ष देखील आपले वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. आपले पक्ष तळगाळापर्यंत पोहचवण्यासाठी पक्षातील नेते प्रयत्न करत आहेत. अशातच सोलपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी शिवसेनेत बंड झाल्यामुळे शिवसेनेमध्ये दोन गट पडले होते. शिवसेनेतील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते तर ठाकरे गटाकडून आता पुन्हा नव्याने पक्षबांधणीचं काम हाती घेण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांसोबत शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशाच्या वेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे.(Latest Marathi News)

आगमी लोकसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पक्ष बांधणी सुरू केलीय. दक्षिण तालुक्यातील मळकोटा येथील भाजप ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने हालचाली सुरू केल्या आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT