Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांना दुसरा धक्का? 'हा' खासदार देणार राजीनामा

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास 40 आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर शरद पवार या संपूर्ण घटनेनंतर अॅक्शनमोडमद्धे आले आहेत. तर अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना पक्षाकडून अल्टीमेटम दिला आहे. (Latest Marathi News)

त्यानंतर अनेक आमदार आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. तर अजित पवारांच्या शपथविधीला पाठिंबा देणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांनी काल आपली भूमिका स्पष्ट केली. मी पवार साहेंबासोबत असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हंटलं आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून अमोल कोल्हेंनी मोठी निर्णय घेतला आहे. खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार असल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

खासदार अमोल कोल्हे यांनी 'लोकमत'शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. पुढे बोलताना म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेतून आपला इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी नैतिक मुल्याच्या बरोबरच राहणं मला योग्य वाटतं, सर्व राजकारण पाहता आपला राजीनामा शरद पवारकडे सादर करणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितले आहे.(Latest Marathi News)

काय म्हणालेत खासदार अमोल कोल्हे

राजकारणाची विश्वासर्हता आणि जबाबदारीची नैतिक मूल्ये या विषयी मतदारांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आपला आतील आवाज म्हणतोय साहेबांसोबतच राहावं , म्हणून मी साहेबांसोबतच राहणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी मतदान केलं ते एका विचारधारेवर विश्वास ठेऊन दिले आहे.(Latest Marathi News)

याच मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी माझा खासदार पदाचा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचे कोल्हे यांनी म्हंटलं आहे.

मंगळवारी राजीनामा सादर करणार

खासदार अमोल कोल्हे आज (4 जुलै) रोजी आपल्या खासदारकीचा राजीनामा राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देणार आहेत. आता शरद पवार अमोल कोल्हेचा राजीनामा स्वीकारतात कि नाही हे पाहणं महत्वाचं असेल.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी लिहिलं सोनिया परचुरेंना पत्र; म्हणाले- ही पोकळी कधीही...

IND vs NZ: 99 OUT! ऋषभ पंतचे शतक हुकल्याची खंत; पण, सर्फराज खानच्या दीडशतकाने मैदान गाजवलं

Diwali Festival 2024 : टिकाऊ, इको- फ्रेंडली आकाशकंदीलांना मागणी! बाजारपेठ सजली; किमतींमध्ये दहा टक्के वाढ

"भाई, IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार?" चाहत्याच्या प्रश्नावर Rohit Sharma चे भन्नाट उत्तर, Video Viral

Vijaya Rahatkar: विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती; अर्चना मुजुमदार असतील नव्या सदस्य

SCROLL FOR NEXT