Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: शिंदे गटाला आणखी एक धक्का! मराठा आरक्षणावरून २ खासदारांनंतर आता एका आमदाराचा राजीनामा

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक नेते, आमदार, खासदार आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शिंदे गटाचे वैजापूर गंगापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे यांनी आज विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे, अनेक भागात आंदोलक आक्रमक झाले आहेत. इतर काही पक्षातील नेत्यांसह शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांनी राजीनामा दिला आहे. शिंदे गटाच्या दोन खासदारांनी राजीनामे दिल्याने एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

अशातच विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार रमेश बोरनारे यांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षकडे दिला आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रमाणपत्र मागणीसाठी उपोषण व आंदोलन करीत आहे. परंतु त्यांना अद्यापपर्यंत इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रमाणपत्र मिळू शकले नाही. म्हणून मराठा समाजाच्या या संबंधी अंत्यत तीव्र भावना असून मराठा समाजाच्या या रास्त मागणीसाठी माझा मराठा समाजाच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा असून मी माझ्या विधानसभा सदस्य या पदाचा राजीनामा स्वखुशीने देत आहे, असे बोरणारे यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत असून सोमवारी गंगापुर येथे आमदार प्रशांत बंब यांच्या संपर्क कार्यल्यावर हल्ला झाल्यानंतर सोमवारी रात्री आमदार बोरणारे यांचे संपर्क कार्यलय व घरावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आले आहे.

हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी नुकतंच खासदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर आता एकनाथ शिंदे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता वैजापूर गंगापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे यांनी आज विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

काँग्रेसचे परभणीतील आमदार सुरेश वरपुडकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. वरपुडकर हे पाथरी मतदार संघातील आमदार आहेत.

राजीनाम्याबाबत वरपुडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहलं आहे. मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणासाठी मी विधान सभा सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, आपण माझा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती वरपुडकर यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT