एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार आणि खासदार यांनी पक्षात बंड केलं आणि भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं. तेव्हापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. अनेक बडे नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे यांच्या गटात सामील होतं असल्याचं चित्र आहे. अशातच उद्या 19 जून, शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे. या आधी ठाकरे गटाच्या शिलेदाराने गटाला रामराम ठोकला आहे. (Latest Marathi News)
शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ठाकरे गटाचं उपनेतेपद शिशिर शिंदे यांच्याकडे होतं. या उपनेतेपदाचा राजीनामा शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसं पत्र शिशिर शिंदे यांनी ठाकरेंना लिहिलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिशिर शिंदे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. (Latest Marathi News)
पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा देत शिशिर शिंदे यांनी पत्र लिहिलं आहे. त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं आहे. या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागची सविस्तर भूमिका शिंदे यांनी मांडली आहे. पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत शिशिर शिंदे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. पक्षात घुसमट होत असल्याचं शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)
शिशिर शिंदे यांचा आधी शिवसेना मग मनसे अन् पुन्हा शिवसेना असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी 2018 ला मनसेला साथ सोडत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेत असताना शिशिर शिंदे हे पक्षाचे नेते होते. 2009 ला भांडुप विधानमतदार संघातून आमदार म्हणूनही ते निवडून आले होते. 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिशिर शिंदे यांनी राज ठाकरे यांची निवड केली होती.
शिशिर शिंदे यांचं पत्र
सन्माननीय श्री. उध्दवजी ठाकरे,
पक्षप्रमुख, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे),
मातोश्री,
बांद्रे (पूर्व)
सप्रेम जय महाराष्ट्र !
दि. १९ जून २०१८ रोजी मी अतिशय आत्मीयतेने शिवसेनेत पक्षप्रवेश केला त्यानंतर ४ वर्षांत ३० जून २०२२ पर्यंत मला कोणतीही जबाबदारी मिळाली नाही.
प्रत्येक कार्यकर्त्याची काही ओळख असते. कार्यकत्याच काही गुण असतात. परंतु या चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते. माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे “फुकट” गेली अशी माझी धारणा आहे. ३० जून २०२२ रोजी माझी “शिवसेना उपनेते” म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले. असो.(Latest Marathi News)
मी आजपासून शिवसेनेच्या उपनेतेपदाचा व पक्षाचा राजीनामा देत आहे. माझ्या कोणत्याही कृत्यामुळे शिवसेनेची बदनामी किंवा अप्रतिष्ठा झाली नाही हे मात्र मी निश्चयपूर्वक अभिमानाने नमूद करतो. गेल्या सहा महिन्यांत आपली भेट होणे देखील अशक्य झाले. आपण कोणाला नकोसे होणे माझ्या संवेदनशील मनाला मुळीच रुचत नाही. माझी घुसमट मीच थांबवतो. या पत्राद्वारे कोणतेही जाहीर दोषारोप न करता मी आपणास ‘जय महाराष्ट्र’ करतो.(Latest Marathi News)
धन्यवाद. जय हिंद ! जय महाराष्ट्र !
आपला नम्र,
शिशिर शिंदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.