sakal breaking solapur
महाराष्ट्र बातम्या

मोठी ब्रेकिंग! उजनीतून भीमा नदीत 1 लाख विसर्ग; वीर धरणातूनही 30 हजार क्युसेकचा विसर्ग; पंढरपूर नदीकाठ पाण्याखाली जाण्याची शक्यता

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरण ९९ टक्के भरले असून आता धरणातून भीमा नदी, कालवा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्यात आले आहे. सोमवारी (ता. ५) उजनी धरणातून एक लाख क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला. दुसरीकडे वीर धरणातूनही ३० हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सुरू आहे. त्यामुळे पुढील १२ ते १४ तासांत पंढरपूरजवळील नदी काठाला पुराचा धोका निर्माण होवू शकतो. यापूर्वीच नदीकाठच्या १०५ गावांमधील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण २१ जानेवारीलाच उणे झाले होते आणि २५ जुलैपर्यंत उणे पातळीतच धरण होते. पण, पुण्यातील मुळसधार पावसामुळे धरण अवघ्या १० दिवसांतच १०० टक्के भरले आहे. सध्या उजनी धरणात दौंडवरून दोन लाख क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. तो आता कमी कमी होत आहे. दरम्यान, धरणात ११७.२८ टीएमसी पाणी मावते, त्यात ५३.५७ टीएमसी उपयुक्त तर ६३.६६ टीएमसी मृतसाठा आहे. पावसाळा अजून दोन महिने शिल्लक असल्याने आता धरणात १०७ टीएमसीपर्यंत पाणी ठेवून उर्वरित पाणी नदी, कॅनॉल, उपसा सिंचन योजनांमधून सोडून दिले जात आहे. दुसरीकडे वीर धरणही भरल्याने त्यातून पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीला पूर येवू शकतो, अशी स्थिती आहे.

पूरस्थिती टाळण्याचा आटोकाट प्रयत्न

वीर धरणातून भीमा नदीत ३० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला असून आता उजनी धरणातून सोडलेला विसर्ग आता १ लाख केला जाणार आहे. पंढरपूर परिसरातील भीमा नदीच्या पात्रात एक लाख २० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग मावतो. पण, त्याहून जास्त विसर्ग वाढल्यास भीमा नदी काठावरील १०५ गावांना धोका होवू शकतो. त्या सर्वांनाच ग्रामसुरक्षा समित्यांच्या माध्यमातून सकर्त राहण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, पूरस्थिती निर्माण होवून जनजीवन विस्कळीत होणार नाही, यासाठी प्रयत्न केला जात आहे.

पूरग्रस्त लोकांना मदतीसाठी ‘हा’ क्रमांक

१८००२७०३६०० ग्रामसुरक्षा समिती यंत्रणेचा क्रमांक आहे. पोलिस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत, पोलिस ठाणे, तहसीलदार यांच्याशी सपंर्क साधता येईल. गरजेच्यावेळी सातारा, पुणे या जिल्ह्यातून ‘एनडीआरएफ’चे पथक बोलविण्याचीही तयारी जिल्हा प्रशासनाची आहे. २०२० नंतर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली नाही, पण संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष अद्ययावत केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana election results: ''अशी मागणी केली तर दंड केला जाईल'', हरियानातील निकालावरुन कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले

Malad Murder: मालाड मारहाणीत मृत्यू झालेल्या मनसे पदाधिकार्‍याच्या कुटुंबाची राज ठाकरेंनी घेतली भेट

LIC Agents: ग्राहकांच्या अडचणी वाढणार; LIC एजंटचा देशभर आंदोलन करण्याचा इशारा, काय आहे कारण?

IND vs NZ 1st Test : हे तर पाकिस्तानपेक्षा बेक्कार निघाले! टीम इंडियाच्या नावावर ५ लाजीरवाणे विक्रम, न्यूझीलंडच्या नावावर पराक्रम

Solapur Election : 'MIM सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाणारा पक्ष, सोलापुरातील 'या' मतदारसंघांत देणार उमेदवार'

SCROLL FOR NEXT