Computer-Typing sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय! दहावी- बारावीच्या धर्तीवर आता टंकलेखनाचीही फेरपरीक्षा; जुन्या मशिनवरील परीक्षा बंदचाही प्रस्ताव

टंकलेखनात अनुत्तीर्णांची आतापर्यंत कधी फेरपरीक्षा घेतली जात नव्हती. त्यामुळे आता पहिल्यांदाच दहावी-बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेच्या धर्तीवर टंकलेखन परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची देखील दर तीन महिन्याला फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दरवर्षी राज्यातील चार लाख विद्यार्थी टंकलेखनाची परीक्षा देतात, पण अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येत नाही. त्यांची आतापर्यंत कधीच फेरपरीक्षा घेतली जात नव्हती. त्यामुळे आता पहिल्यांदाच दहावी-बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेच्या धर्तीवर टंकलेखन परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची देखील दर तीन महिन्याला फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नुकतीच टंकलेखनाची परीक्षा घेतली असून त्या विद्यार्थ्यांचा निकाल ३१ जुलै ते १० ऑगस्ट या काळात जाहीर होणार आहे. त्यानंतर या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांना लगेचच दोन महिन्यांनी फेर परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या टंकलेखन परीक्षेसाठी जुन्या टंकलेखन मशीवर परीक्षा देणाऱ्यांची संख्या नऊ हजारांपर्यंत होती. पण, त्यातील चार हजार विद्यार्थी परीक्षेसाठी आलेच नाहीत तर बाराशे विद्यार्थ्यांनी पेपर सोडविलाच नाही.

काळाच्या ओघात जुनाट टंकलेखन मशीनचा वापर कमी झाला असून आता या मशीनवरील परीक्षा कायमचीच बंद करावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांना पाठविला आहे. त्याठिकाणी प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास टंकलेखनाची खडखडाट कायमचीच बंद होऊन सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा संगणकावर होईल.

केंद्रांवरच होईल आता टंकलेखन परीक्षा

राज्यभरातील साडेतीन ते चार लाख विद्यार्थ्यांची टंकलेखनाची परीक्षा घेताना अनेकदा तंत्रनिकेतन किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयांकडील केंद्रे उपलब्ध होत नाहीत. त्यावेळी परीक्षा घेण्यास अडचणी निर्माण होतात, असे अनुभव अनेकदा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला यापूर्वी आले आहेत. त्यामुळे आता टंकलेखनाची परीक्षा त्या त्या केंद्रांवरच घेतली जाणार आहे. पण, त्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील आणि परीक्षेवेळी त्या संगणकाचा वेब कॅमेरा सुरू करावा लागेल.

आता टंकलेखनाची परीक्षा त्याच केंद्रांवर घेण्याचे नियोजन

टंकलेखनाची परीक्षा प्रत्येक सहा महिन्याला होते, पण आता या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लगेचच संधी मिळावी म्हणून प्रत्येक तीन महिन्यातून एकदा रिपिटर विद्यार्थ्यांचीही फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. स्टेनो टायपिंगची परीक्षा देखील यापुढे ऑनलाइन होतील. याशिवाय यापुढे टंकलेखनाची परीक्षा त्याच सेंटर्सवर सीसीटीव्ही, वेब कॅमेऱ्याच्या निगराणीत घेण्याचेही नियोजन सुरू आहे.

- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT