solapur zp ceo manisha awhale  sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर झेडपी सीईओंचा मोठा निर्णय! ‘माध्यमिक शिक्षण’च्या ‘या’ ३३ सेवा १ ऑगस्टपासून ऑनलाइन; शाळांना स्वतंत्र ई-मेल आयडी; कामकाजात आता सुसूत्रता व पारदर्शकता

माध्यमिक शिक्षण विभागाचे कामकाज गुरुवारपासून (ता. १) ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे पेन्शन व वैद्यकीय बिले वगळता महत्त्वाच्या ३३ सेवांसाठी आता माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, लिपिकांना शिक्षण विभागाच्या कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागाचे कामकाज गुरुवारपासून (ता. १) ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे पेन्शन व वैद्यकीय बिले वगळता महत्त्वाच्या ३३ सेवांसाठी आता माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, लिपिकांना शिक्षण विभागाच्या कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. मुख्याध्यापक मान्यता, निवडश्रेणीसह महत्त्वाची कामे ऑनलाइन होणार असल्याने वेळ व पैशांची बचत होणार आहे. याशिवाय कार्यालयात दररोज होणाऱ्या गर्दीलाही ब्रेक लागणार आहे. अशा सेवा ऑनलाइन देण्याचा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

माध्यमिक शिक्षण विभाग अनेक कारणांनी यापूर्वीच बदनाम होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शिक्षण विभागात बदल घडविण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी कार्यालयाचे कामकाज ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. त्याची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार आहे. जिल्ह्यात एकूण एक हजार ९५ माध्यमिक शाळा असून, माध्यमिक शिक्षण विभागाच्या सुमारे ३८-३९ सेवांसाठी मुख्याध्यापक, लिपिकांना सोलापूरच्या कार्यालयात यावे लागत होते. त्यातूनच गैरप्रकारांना खतपाणी मिळत होते. पण, आता बहुतांश सेवा ऑनलाइन केल्याने प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रकार थांबून सर्वांचीच कामे पारदर्शकपणे वेळेत होतील, असा विश्वास शिक्षणाधिकारी श्री. जगताप यांनी व्यक्त केला आहे.

शाळांना स्वतंत्र ई-मेल आयडी

ऑनलाइन कामकाजासाठी माध्यमिक शाळांना स्वतंत्र शासकीय ई-मेल आयडी काढावा लागणार आहे. त्याच मेलवरून त्यांना प्रस्ताव व प्रकरणे पाठवावी लागणार आहेत. यासाठी डिजिटल स्वाक्षरी अधिकृत मानली जाणार आहे. त्याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्या असून, त्याची मुदत २९ जुलैपर्यंत दिली होती. पण, त्यांना आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑनलाइन सेवांसाठी ‘सीएसआर’मधून निधी

माध्यमिक शिक्षण विभागाच्या ऑनलाइन कामकाजासाठी कार्यालयात काही संगणक व १० स्कॅनर, प्रिंटर लागणार आहेत. त्यासाठी कंपन्यांकडील सीएसआर निधीतून मदत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले.

‘माध्यमिक’च्या ३३ सेवा उद्यापासून ऑनलाइन

१ ऑगस्टपासून माध्यमिक शिक्षण कार्यालयाचे कामकाज ऑनलाइन होणार आहे. महत्त्वाच्या ३३ सेवांसाठी मुख्याध्यापक, लिपिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. पेन्शन व वैद्यकीय प्रकरणात मूळ कागदपत्रे सादर करावी लागतात, त्यामुळे कागदपत्रांची खातरजमा करावी लागते आणि त्यामुळे सध्या त्यासाठी संबंधितांना कार्यालयात प्रत्यक्ष यावे लागेल. सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे ऑनलाइन कामकाज व्यवस्थित होईल, असा विश्वास आहे.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT