महाराष्ट्र बातम्या

Chardham Yatra: चारधाम यात्रेच्या नावाखाली भाविकांची मोठी फसवणूक; 'या' कंपनीने भक्तांच्या श्रद्धेचा घेतला फायदा

रूपेश बुट्टेपाटील

रूपेश बुट्टेपाटील

Pune: चार धामची यात्रा आयोजित करून भाविकांना सोयी-सुविधा देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार खेड,आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील भाविकांत घडला आहे.

भुसावळ येथील एका यात्रा कंपनीने या तीन तालुक्यात मिळून जवळपास ६० भाविकांची फसवणूक केली आहे.यात्रेकरूंपैकी भगवान टेमगिरे,अंकुश कदम,भानुदास गाडे यांनी याबाबत आवाज उठविला आहे.

खेड,आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील जवळपास ६० भाविक गंगोत्री,यमनोत्री,केदारनाथ,बद्रीनाथ या चार धाम यात्रेला भुसावळ येथील सिद्देश टूर्स अँड ट्रॅव्हल्स मार्फत गेले होते.ही यात्रा ३१ मे ते १४ जून या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.यासाठी संबंधित भाविकांनी प्रत्येकी २२५००/- रुपये जमा केले होते.६० लोकांचे मिळून १४ लाख दहा हजार रुपये दिले होते.

यात फॅमिलीसाठी स्वतंत्र रूम,जेवण,बस भाडे आदींचा समावेश होता.परंतु प्रत्यक्ष यात्रेला गेल्यानंतर भाविकां वेगळेच चित्र दिसले.त्यांच्याकडून बहुतांश वेळा अधिकचे पैसे घेण्यात आले किंवा काही ठिकाणी त्यांना स्वतः खर्च करावे लागले.

प्रवास करीत असताना अचानक बस थांबवून पुढील खर्चासाठी अधिकची रक्कम मागण्यात आली. ठरलेल्या रकमेपेक्षा जवळपास ८० हजार रुपये अधिकची रक्कम या भाविकांकडून वसुल करण्यात आली.

संबंधित भाविकांनी याबाबत यात्रा आयोजकांना वेळोवेळी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पैसे द्यावेच लागतील असे सांगितले. आपण एवढ्या लांब आलो आहोत या भावनेतून अपरिहार्यतेमुळे भाविकांनी पैसे दिले.

यात्रा आयोजकांच्या या अवास्तव पैसे मागणीमुळे संबंधित भाविकांनी उत्तर काशी येथे दोन वेळा आणि हरिद्वार येथे एक वेळेस संबंधित यात्रा आयोजकाविरोधात पोलिसात तक्रार दिली असल्याचे टेमगिरे,कदम यांनी सांगितले.

भाविकांची अशा प्रकारे सर्व सोयीसुविधायुक्त यात्रेचे आमिष दाखवून लांब नेऊन फसवणूक करणाऱ्या अशा यात्रा कंपनीवर गुन्हा दाखल करावा आणि भाविकांचे जास्तीचे घेतलेले पैसे परत करावे अशी मागणी या भाविकांकडून करण्यात आली आहे. याबाबत कंपनी मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

या कंपनीवर कोणी भाविकांनी विश्वास ठेवू नये आणि त्यांच्यामार्फत यात्रेला जाऊ नये. तसेच आमचे जास्त घेतलेले पैसे परत मिळावे.

अंकुश कदम ( सावरदरी येथील भाविक ) -

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT