maharashtra sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! राज्यातील 850 कृषी सेवा केंद्रांना टाळे; दर्जाहीन खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री; 241 दुकानांचे परवाने निलंबित

राज्यात जूनअखेर बियाणे, खते व कीटकनाशकांचा २५५ मे.टन साठा जप्त करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत अडीच कोटींपर्यंत आहे. राज्यात बियाणे, खते या निविष्ठांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी कृषी सहायकांच्या निगराणीखाली कृषी सेवा केंद्रांवर त्यांची नियुक्ती करून कापूस बियाणे व खतांची विक्री केली जात आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात सध्या खरीप पेरणीची लगबग सुरू असून खते, बियाणे, कीटकनाशकांची खरेदी शेतकरी मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. पण, कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाच्या भरारी पथकाला खते, बियाणे व कीटकनाशकांच्या निविष्ठांचे २९२ नमुने अप्रमाणित आढळले आहेत. १७ नमुन्यांवर कोर्ट केस दाखल झाल्या असून ६१ ठिकाणी पोलिसांत गुन्हेही दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ८५० कृषी सेवा केंद्रांचा परवाने रद्द करण्यात आले असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील १५ दुकानांचा समावेश आहे. तर २४१ दुकानांचे परवाने काही महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन दुकानांचा समावेश आहे.

राज्यात जूनअखेर बियाणे, खते व कीटकनाशकांचा २५५ मे.टन साठा जप्त करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत अडीच कोटींपर्यंत आहे. राज्यात बियाणे, खते या निविष्ठांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी कृषी सहायकांच्या निगराणीखाली कृषी सेवा केंद्रांवर त्यांची नियुक्ती करून कापूस बियाणे व खतांची विक्री केली जात आहे. बियाणे, खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना तक्रारी करण्यासाठी १८००-२३३-४००० व ९८२२४४६६५५ असे दोन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याठिकाणी आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्याअनुषंगाने भरारी पथकांकडून संबंधित दुकानांची तपासणी केली जात आहे.

३९५ भरारी पथकांची नेमणूक

बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता व नियंत्रणाची कार्यवाही करण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने तब्बल ३९५ भरारी पथके नेमली आहेत. त्यांच्या माध्यमातून अचानकपणे कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली जात आहे. त्यावेळी दुकानातील खत व विक्री केलेल्या खताचा साठा जुळत नाही, त्या निविष्ठांची गुणवत्ता ६५ टक्क्यांपेक्षा कमी असणे, मुदतबाह्य खते-औषधांची विक्री, लिंकिंगचा आग्रह अशा विविध कारणांमुळे अनेक दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले असून ८५०हून अधिक कृषी सेवा केंद्रांना टाळे ठोकण्यात आले आहे. त्यात नाशिक, नागपूर, लातूर व पुणे विभागात सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत.

भरारी पथकांद्वारे कृषी सेवा केंद्रांवर वॉच

खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांना दर्जेदार निविष्ठांच्या विक्रीसंदर्भात सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीसाठी ३९५ भरारी पथके नेमली असून त्यांच्या माध्यमातून जूनअखेर ८०० हून अधिक दुकानांचा परवाना रद्द तर २४१ जणांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

- प्रवीण देशमुख, गुणनियंत्रण अधिकारी (कृषी), महाराष्ट्र

राज्यात ७१ लाख हेक्टरवर पेरणी

राज्यात खरीप पिकांखालील एक कोटी ४२ लाख दोन हजार ३१८ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत राज्यभरात ७१ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. कोकण विभागात चार टक्के, नाशिक विभागात ४५ टक्के, पुणे विभागात ६७ टक्के, कोल्हापूर विभागात ४८ टक्के, छत्रपती संभाजी नगर विभागात ७८ टक्के, लातूर विभागात ६३, अमरावती विभागात ४१ टक्के तर नागपूर विभागात २८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अजूनही ७० लाख हेक्टरवर पेरणी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT