Majhi Ladki Bahin Yojana How to fill the form and Who is eligible for this scheme solapur
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’चा अर्ज बदलला; लाभार्थींना मोफत मिळणार अर्ज; ‘या’ 5 ठिकाणी देता येणार भरलेला ऑफलाइन अर्ज

तात्या लांडगे

सोलापूर : ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतून वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. त्यासाठी सुरवातीला अटी-शर्थीचा अर्ज देण्यात आला. मात्र, मंगळवारी उत्पन्नाचा दाखला व रहिवासी दाखल्याची अट काढून टाकण्यात आली असून २१ ते ६० ऐवजी वयोमर्यादा देखील ६५ वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. पण, त्याचा शासन निर्णय झाला नसून बदलानुसार नवीन अर्ज देखील उपल्ध झाला आहे. ऑफलाइन भरलेले अर्ज पाच ठिकाणी जमा करण्याची सोय करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या योजनेसाठी पात्र महिलांना आता १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, जन्म दाखला, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र जोडून अर्ज करता येणार आहे. दुसरीकडे ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड आहे त्यांना देखील उत्पन्नाच्या दाखल्याशिवाय अर्ज करता येईल. तहसील कार्यालयात किंवा सेतू सुविधा केंद्रे, महा ई सेवा केंद्रांवर जाण्याची वेळ येणार नाही, असा शासनाने निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले असून बुधवारी (ता. ३) सेतू कार्यालये व महा ई सेवा केंद्रांवर गर्दी नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, पात्र महिलांनी भरलेले अर्ज त्यांना गावातील अंगणवाडी केंद्रांवर, ग्रामपंचायत कार्यालये, शहरातील वॉर्ड अधिकारी कार्यालये, शहर- जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांमध्ये जमा करता येणार आहेत.

अर्ज जमा करण्याची सोय एकाच ठिकाणी

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी भरलेले ऑफलाइन अर्ज जमा करण्यासाठी शासनाकडून पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यात अंगणवाडी केंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये, शहरी भागातील वॉर्ड अधिकारी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रे, महा ई सेवा केंद्रे व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांचा समावेश आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ अंगणवाडी केंद्रांवरच अर्ज स्वीकारले जात असल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या अनुषंगाने बुधवारी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

अर्ज भरल्यावर पावती आवर्जून घ्या

मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना तो अचूक भरावा. प्रत्येक अर्जाची जिल्हास्तरीय समितीकडून पडताळणी होणार आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा. अर्ज जमा केल्यानंतर त्याची पावती जरुरी घ्यावी. जेणेकरून आपल्याकडे पुरावा म्हणून पोच असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT