'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे अनेकजण भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत.'
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचाच दावा आहे आणि तो कायम असणार आहे. मी उमेदवार असेन की नाही हे वरिष्ठ ठरवतील; पण कमळ निशाणीवरचा उमेदवार असेल हे नक्की आहे. मी लोकसभेसाठी इच्छुक नाही. माझ्या संदर्भातील निर्णय वरिष्ठ घेतील. निवडणुकीच्या (Loksabha Election) अगोदर बोलणे उचित नाही, असे स्पष्ट मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि उद्यममंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. औद्योगिक महोत्सवाच्या निमित्ताने राणे रत्नागिरीत आले असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रिफायनरीसंदर्भात विचारले असता ते (Narayan Rane) म्हणाले, ‘रिफायनरी मी आणणार. माझे संबंधित मंत्र्यांशी बोलणे सुरू आहे. संबंधित कंपनीशी मंत्र्यांचा संवाद सुरू आहे. रिफायनरीमुळे (Refinery Project) मोठा रोजगार तयार व्हावा, छोटे-मोठे उद्योजक यावेत आणि ते स्थानिक असावे, असा आमचा प्रयत्न आहे. रिफायनरीमुळे रत्नागिरीचा मोठा विकास होणार आहे.’
ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणासंदर्भात आख्ख्या महाराष्ट्राची भूमिका ट्विट केली आहे. सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भाजपमध्ये कोण येईल, त्याचे स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. लघु, सूक्ष्म खात्याचे कार्यालय रत्नागिरीत उभे करणार असून, त्यासाठी जागा पाहायला सांगितली आहे.’
भाजपच्या केंद्रीय लघु, सूक्ष्म खात्याचा रत्नागिरी उद्योग महोत्सव रत्नागिरीत झाला. पक्षाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते; परंतु रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने तर्कवितर्क बांधले जात आहेत. माजी खासदार नीलेश राणे यांनीही माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांच्याकडे मानेंच्या अनुपस्थितीबाबत विचारणा केली.
या उद्योग महोत्सवामध्ये बोलताना माजी खासदार नीलेश राणे, ‘गोव्यामुळे सिंधुदुर्गला आणि मुंबईमुळे रायगड जिल्ह्याचा विकास झाला आहे; परंतु रत्नागिरी जिल्ह्याचा विकासच झाला नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विनंती आहे की, रत्नागिरीचा सर्व बॅकलॉग भरून निघेल अशी भरघोस घोषणा करा.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.