Sambhajiraje Chhatrapati Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंचं मोठं विधान; म्हणाले, 'मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय पुढं..'

सुराज्य म्हणजे काय, हे रायगडावर गेल्याखेरीज कळणे अशक्य आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्य शासनाने मराठा समाजाचे (Maratha Reservation) मागासलेपण सिद्ध करणे जरुरीचे आहे.

कोल्हापूर : एकाही सरकारला ‘कॅबिनेट’ची बैठक रायगडावर (Raigad) घ्यावी, असे का वाटत नाही? असा प्रश्‍न संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आज उपस्थित केला. मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध झाल्याखेरीज पुढे जाता येणार नाही, असेही ते म्हणाले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

नवीन राजवाडाच्या (न्यू पॅलेस) परिसरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संभाजीराजे म्हणाले, ‘रायगड ही छत्रपती शिवरायांची राजधानी आहे. सुराज्य म्हणजे काय, हे रायगडावर गेल्याखेरीज कळणे अशक्य आहे. त्यासाठी सरकारने तेथे कॅबिनेट बैठक घेणे आवश्‍यक आहे. दुर्दैवाने सरकारला तशी इच्छा वाटत नाही.'

ते पुढे म्हणाले, राज्य शासनाने मराठा समाजाचे (Maratha Reservation) मागासलेपण सिद्ध करणे जरुरीचे आहे. मागासवर्गीय आयोगासमोर ते सिद्ध झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पाठवला जाईल. मराठा समाजाचा कसा सर्व्हे करणार, समाजाला आरक्षण कसे देऊ शकतो, याची स्पष्टोक्ती महत्त्वाची आहे. जाती-पातीच्या पुढे जाऊन विचार केला पाहिजे.

अठरापगड जाती-धर्मांचा महाराष्ट्र आहे. येथे मराठा व ओबीसी यांना एका छताखाली कसे आणता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांच्यासमोर शिव-शाहूंची भूमिका मांडायला हवी. नव्या संसदेत खासदारांना प्रश्‍न मांडण्याची संधी आहे. दुर्दैवाने पंधरा-वीस वर्षांत संसदेचे कामकाज जसे चालायला हवे तसे चाललेले नाही. नव्या सभागृहात लोकांचे अधिकाधिक प्रश्‍न सुटावेत, इतकीच अपेक्षा आहे, असेही संभाजीराजेंनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT