Union Minister Ajay Kumar Mishra Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Satara : अजितदादा आल्याने भाजपवर कसलाही परिणाम नाही, साताऱ्यात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा दावा

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ४८ जागांवर भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

'राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्याचे १८ कोटी सदस्य आहेत.'

सातारा : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ४८ जागांवर भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणणार आहे. त्याकरिता भाजपची संघटनात्मक बांधणी अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण, विश्वकर्मा योजना आदी विविध योजनांच्या माध्यमातून देशाला एका वेगळ्या पातळीवर नेले आहे, असा विश्‍वास साताऱ्याचे संपर्क प्रभारी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते (Ajay Kumar Mishra) बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे प्रभारी अमर साबळे, अतुल भोसले, मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष विकास गोसावी, सचिव विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते.

मिश्रा म्हणाले, ‘‘गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भारताच्या नव्या संसद भवनामध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. यामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण याशिवाय जी-२० परिषद आणि १३ हजार कोटींची महत्त्वाकांक्षी विश्वकर्मा योजना यामुळे भारताने देशातील विविध विकास योजनांना वेगळी गती दिली आहे.

जी-२० परिषदेच्या माध्यमातून भारताने आपली संस्कृती आणि परंपरा यांची वेगळी ओळख जगाला घडवून दिली आहे. या परिषदेचे भारतातील ६० शहरांमध्ये बैठका घेण्यात आल्या होत्या. विश्वशांतीच्या दृष्टीने आणि विश्वकल्याणाच्या दृष्टीने भारत हे एक प्रमुख केंद्र असल्याची जाणीव या परिषदेच्या निमित्ताने निर्माण झाली आहे.’’

महाराष्ट्रामध्ये खासदारकीच्या ४८ जागा असून, येथे आमचे १८ कोटी सभासद झाले आहेत. या खासदारकीच्या सर्व जागा आम्ही खात्रीने निवडून आणणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहरा कोणता असणार, याविषयी मिश्रा म्हणाले, ‘‘साताऱ्यामध्ये संघटन मजबूत असून, येथे उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. अद्याप वरिष्ठ कार्यकारिणीची बैठक झालेली नाही. ज्यावेळी बैठकीच्या माध्यमातून योग्य व्यक्तींचे निर्णय होतील, त्यावेळी ही नावे जाहीर केली जातील.

पुसेसावळी दंगल प्रकरणावर त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणातील काही जणांना अटकही करण्यात आली आहे. पोलिसांकडून हा प्रकार योग्य पद्धतीने हाताळला जाईल. मराठा आणि धनगर आरक्षणाच्या संदर्भातही ते म्हणाले, ‘‘या संदर्भामध्ये घटनात्मक तरतुदी तपासून चिकित्सा समितीकडे यासंदर्भात चर्चा सुरू आहे. योग्य वेळी या दोन्ही आरक्षणाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल,’’ असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

अजितदादा आल्याने भाजपवर परिणाम नाही

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) हे महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्याचा राज्यात कितपत फरक पडेल, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, ‘‘राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्याचे १८ कोटी सदस्य आहेत, त्यामुळे भाजपला काही फरक पडेल, असे नाही. पक्षाची ध्येयधोरणे आणि संघटनात्मक कामे वरिष्ठ केंद्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने सुरू आहेत. जो फरक पडणार, तो प्रादेशिक स्वरूपाच्या छोट्या-मोठ्या पक्षांना पडणार आहे,’’ असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

सुखविंदर सिंग आणि पुण्याचं आहे खास कनेक्शन, म्हणतात- इथे आलो की कधीच गाडीने फिरत नाही कारण...

Latur Assembly Election 2024 : देशमुख विरुद्ध चाकूरकरांमध्ये सरळ लढत, लातूर शहर मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT