devendra fadanvis 
महाराष्ट्र बातम्या

"केवळ १२ नाही तर सर्वच्या सर्व आमदारांवर कारवाई केली तरीही..."

"केवळ १२ नाही तर सर्वच्या सर्व आमदारांवर कारवाई केली तरीही..." भाजपच्या आमदारांना निलंबित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक BJP 12 MLA Suspended from Monsoon Vidhan Sabha Adhiveshan Devendra Fadnavis Furious Reaction

विराज भागवत

भाजपच्या आमदारांना निलंबित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक

मुंबई: तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदाराचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी तालिका अध्यक्षांच्या जवळ जाऊन निषेध व्यक्त केला. त्यानंतर, मला शिवीगाळ करण्यात आली असा आरोप करत भास्कर जाधव यांनी कारवाईची मागणी केली. भाजपच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर विरोधी पक्षाने पावसाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकला. विरोधकांचे संख्याबळ कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. (BJP 12 MLA Suspended from Monsoon Vidhan Sabha Adhiveshan Devendra Fadnavis Furious Reaction)

देवेंद्र फडणवीस म्हणाले...

  • आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती ती शंका सरकारने खरी केली. आम्ही सरकारला OBC आरक्षणावरून उघडं पाडलं, म्हणून सरकारने आमच्या आमादारांना खोटं पाडून १२ आमदारांवर कारवाई केली. पण बाराच काय सगळ्या १०६ आमदारांचे जरी सदस्यपद रद्द केले तरी आम्ही आवाज उठवणारच. या आधीही अनेकदा मंचावर लोक चढले आहेत, पण कधी कोणावर अशी कारवाई झाली नाही. संख्याबळ कमी करण्याचा डाव रचत हे कारवाई करण्यात आली.

  • माझ्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याचा ठराव केला तरीही काहीच हरकत नाही. पण मी खरं सांगतो की आमच्या आमदारांनी तिथे शिवीगाळ केली नाही. उलट सेनेचे सदस्यच तिथे येऊन त्यांनी धक्काबुक्की केली. आमचे सदस्य आक्रमक झाले होते, पण त्यांना आम्ही शांत केलं होतं. सरकारच्या आमदारांनी ही स्टोरी तयारी केली आणि आमच्या आमदारांवर कारवाई केली.

  • आरक्षणा संबंधीचे आजचे दोनही प्रस्ताव चुकीचे आहेत. वेळकाढुपणासाठी हे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. इम्पेरिकल डेटा जमा करत नाहीत. त्यावरून उगाचच केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. OBC आणि मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या सरकारकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT